नरेंद्र मोदी- कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता देशात लॉकडाऊनची गरज नाही

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

अर्थात, अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन कोरोनाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलं.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज (13 जानेवारी) 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला.

कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे.

"होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं," असं पंतप्रधानांनी म्हटलं.

ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना

पंतप्रधान मोदींनी दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

19 राज्यांमध्ये 10 हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी (12 जानेवारी) दिली होती.

भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2,47,417 नव्या केसेस समोर आल्या आहेत. गेल्या एका दिवसाच्या तुलनेत ही 27 टक्क्यांची वाढ आहे. एका दिवसात देशात कोरोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासात 84,825 जण या आजारातून बरे देखील झाले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)