सिंधुदुर्ग बँक: नारायण राणे- सर्वांना पुरुन उरलोय, आता लक्ष्य राज्याची सत्ता

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचं पॅनल विजयी झालं आहे. भाजपनं 11 जागांवर जिंकत बँकेवर सत्ता मिळवली, तर महाविकास आघाडीचं पॅनल 8 जागा जिंकू शकलं.

भाजपच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदार नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत कामाला आल्याचं प्रतिपादन नारायण राणेंनी केलं.

यावेळी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्याबाबत विचारलं असता, ते संतापले. त्यांनी नितेश राणेंवरील गुन्ह्यासंदर्भात बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"आता महाराष्ट्राकडं लक्ष्य म्हणजे, तिथं सत्ता आमची नाहीय. थोडक्यात हुकलीय. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. आज मुख्यमंत्री नाही. त्यामुळे हे विकसित राज्य अधोगतीकडे चाललंय. किमान दहा वर्षे तरी. अशा अवस्थेत ते राहू नये. या राज्यातील साडेतेरा कोटी जनतेला सुखाची परिस्थिती निर्माण व्हावी, म्हणून केंद्रात जसं मोदी योजना आणतात, तसा मुख्यमंत्री राज्यात हवाय. लगानची टीम नकोय आम्हाला," असा टोला राणेंनी लगावला.

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

"कुठल्याही चौकशांना मी घाबरत नाही. सर्वांना आतापर्यंत पुरुन उरलोय," असंही राणे म्हणाले.

"या निवडणुकीत पोलीस यंत्रणेचा वापर करण्यात आला. एका जिल्ह्याची निवडणूक. तीन पक्ष एकत्र आहेत. अर्थ खात्याचे मंत्री येतात. तिन्ही पक्षांना पराभूत करून परत जातात. त्याला अक्कल म्हणतात," असं म्हणत राणेंनी अजित पवारांना टोमणा मारला.

राजन तेली यांच्या पराभवावर बोलताना राणे म्हणाले, राजन तेली यांची योग्य ठिकाणी वर्णी लावणार.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयावर बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेनुसार सुरुवात भाजपाच्या विजयाने झाली आहे. 19 पैकी 11 जागांवर आमचं वर्चस्व कायम राहिलंय. सत्तेच्या जोरावर सुरू असलेलं राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणेजी आणि नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना ही सणसणीत चपराक आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

दरम्यान, नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, पाहणं महत्वाचं ठरेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)