You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॅाप्टर आणि विमान प्रवासात 'हे' 7 नियम पाळावेच लागतात
तामिळनाडूच्या कुन्नुर या ठिकाणी लष्कराच्या हेलकॉप्टरला अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बिपीन रावत यांच्या विमानाला तामिळनाडूमधील कुन्नूर इथं अपघात झाला होता.
बिपीन रावत ज्या Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतलं रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. प्रामुख्यानं लष्करी वाहतुकीसाठी Mi-17V5 हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो.
भारतातल्या अति-महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 2014 मध्ये 'एअर सेफ्टी' परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं.
VIP मंडळींच्या लहान विमानं आणि हेलिकॅाप्टर प्रवासासाठी या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. खासकरून निवडणूक काळात नेते आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींकडून होलिकॅाप्टरचा वापर होत असल्याने या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
VIP's च्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेचे नियम
- पायलटचे लायसेंन्स सर्टिफाईड असावेत.
- हेलिपॅडचं सिलेक्शन योग्य असावं.
- हेलिकॅाप्टर लॅंड होण्यासाठी योग्य जागा असावी.
- विमानाच्या क्रू ने प्रवासाची योग्य माहिती ठेवावी. झाडं, हाय टेन्शन वायर्स आणि हेलिपॅडचे को-ऑर्डिनेट योग्य तपासून घ्यावेत.
- विमान प्रवासाचा रूट आणि किती लोक असणार आहेत याची माहिती जवळच्या एअर टॅृफिक सेंटर (ATC) ला देण्यात यावी.
- विमान प्रवासापूर्वी हवामानाची पूर्व माहिती घ्यावी.
- प्री- फ्लाईट मेडिकल तपासणी अनिवार्य आहे.
- विमानात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा माल नसावा याची खबरदारी घ्यावी.
- लॅडिंग आणि टेक-ऑफ करताना सुरक्षा उपाययोजना पाळाव्यात.
- लष्कराचे अधिकारी हेलिकॅाप्टरमधून प्रवास करत असतील तर दोन इंजीनचं हेलिकॅाप्टर असणं आवश्यक.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासाचे नियम
- दोन पेक्षा जास्त जनरल रॅंकचे अधिकारी एकत्र प्रवास करू शकत नाहीत.
- दोन इंजिन असलेलं हेलिकॅाप्टर प्रवासासाठी आवश्यक.
- सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची.
- ठराविक आणि ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी. ही वेळ बदलली जात नाही.
- हवामान आणि महिन्या प्रमाणे प्रवास निश्चित असतो.
- ज्या ठिकाणी उतरणार किंवा तिथून उड्डाण घेणार त्या ठिकाणी इंधनाचा यांचा पुरेसा असावा.
- आपात्कालीन परिस्थितीत ambulance आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी.
एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाई प्रवासावेळी दोन्ही पायलटचं प्रशिक्षण नेमकं काय आणि कसं झालं आहे, संबंधित विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये टेक्निकल सर्व गोष्टी नेमक्या काय आहेत याची माहिती आधी घेतली जाते. शिवाय विमानात वजन किती असावं याबाबत स्पष्ट नियम असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्री प्रवास करायचा नाही असा नियम आहे. शिवाय दुर्घटना घडू नयेत म्हणून घेण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती प्रवाशांना देण्यात आलेली असते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)