Bollywood : महाबळेश्वर ते मॉरिशस... असा आहे बॉलिवूडमधील लोकेशनचा प्रवास

बॉलीवूड, चित्रपट, कोरोना

फोटो स्रोत, Robert Alexander

फोटो कॅप्शन, विदेशात भारतीय चित्रपटाचं शूटिंग
    • Author, मधु पाल
    • Role, मुंबईहून बीबीसी हिंदीसाठी

प्रथमच एखाद्या हिंदी चित्रपटाचं शूटिंग विदेशात करण्यात आलं होतं. लग्नानंतर राज कपूर आणि वैजयंती माला हनिमूनसाठी युरोपात जातात. या नव्या जोडप्याच्या रोमान्सची दृश्यं व्हेनिस, पॅरिस आणि स्वित्झरलँडमध्ये चित्रित करण्यात आली होती.

1964 मध्ये आलेला राज कपूरचा 'संगम' हा चित्रपट काही भाग विदेशात चित्रित करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट होता, असं चित्रपट अभ्यासक जयप्रकाश चौकसे सांगातात.

राज कपूर यांच्या प्रॉडक्शनचा हा पहिला रंगीत चित्रपटही होता.

संगम चित्रपटात मुख्य भूमिकेत राज कपूर, वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार होते. प्रेम-त्रिकोनाच्या कथेवर आधारित चित्रपट होता.

'संगम' ब्लॉकबस्टर हिट ठरला. त्यानंतर हळूहळू इतर डायरेक्टर आणि निर्मातेही विदेशात शूटिंग करू लागले. मात्र त्यावेळी हे फार खर्चिक होतं.

निर्माता-दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांचा लव्ह इन टोकियो 1966 मध्ये प्रदर्शित झाला होता. तो टोकियोमध्ये चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी प्रदर्शित झालेला शक्ती सामंत यांचा थ्रिलर 'अॅन इव्हिनिंग इन पॅरिस' ने लोकेशनसाठी पॅरिस निवडलं होतं. त्यानंतर प्रेम पुजारी आणि नंतर यश चोप्रा यांचा दिलवाले दुल्हनिया पाहिल्यानंतर स्वित्झरलँड आणि युरोपचे लोकेशन असलेलं चित्रकरण जणू कालंच झालं असावं असं वाटतं.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना साथीमुळं याला काहीसा ब्रेक नक्कीच लागला होता, पण आता पुन्हा त्याला सुरुवात झाली आहे.

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक विकास वर्मा यांनी त्यांच्या 'नो मीन्स नो' चित्रपटाची पार्श्वभूमी आणि लोकेशनसाठी पोलंडची निवड केली आहे. पोलंडमध्ये शूटिंग होणारा हा पहिलाच बॉलिवूडचा चित्रपट आहे.

यापूर्वी सलमान खान यांच्या किक या चित्रपटाचा अगदी छोटासा सीन त्याठिकाणी शूट करण्यात आला होता.

'प्रचंड तयारी आणि परवानगी सर्वकाही ऑनलाईनच केलं. त्याठिकाणच्या एकमेव मंत्री आणि खासदार इंडो-पोलिश कमिटीच्या अध्यक्षही आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही शूटिंग केली त्या बिएल्स्को बिआला मध्ये प्रशासनानं आम्हाला सर्वप्रकारे मदत केली. बॉलिवूडचे चित्रपट आणि संगीत याठिकाणच्या लोकांना आवडतं,' असं विकास वर्मा बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले.

चित्रपटात मुख्य भूमिका विकास वर्मा यांचा मुलगा ध्रुव वर्मा आणि गुलशन ग्रोवर यांची आहे.

बॉलीवूड, चित्रपट, कोरोना

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL

फोटो कॅप्शन, बॉलीवूड चित्रपट

शूटिंगसाठी भारतातून 70 जण गेले होते. सर्व तयारीनंतरही पोलंडमधील प्रचंड थंडीचा युनिटला अंदाज नव्हता. त्यामुळं सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही दिवसांनी लोकांना घरच्या जेवणाची आठवण झाली आणि भारतीय पदार्थांचा शोध सुरू झाला. ते मिळालं पण शूटिंग लोकेशनपासून अंतर होतं, 300 किलोमीटर. मग तिथून जेवणं मागवलं जाऊ लागलं.

विकास वर्मा म्हणाले की, पोलंडमध्ये काम करण्याचा अनुभव चांगला होता. मैत्री तर झालीच त्याशिवाय परवानग्यांसाठी वारंवार कार्यालयांत चकरा माराव्या लागल्या नाही.

भारतातून गेलेल्या टीमसह सेटवर 2000 पेक्षा जास्त लोक काम करत होते. सर्व तयारी साठी 'नो मीन्स नो' टीमला सहा महिन्यांचा काळ लागला होता. त्यात त्याठिकाणच्या लोकांचं प्रशिक्षण, लोकेशन शोधणं, वातावरणाचा अंदाज घेणं, पार्किंग कुठे आहे, नाही या सर्व तयारीचा समावेश होता.

विकास वर्मा त्यांच्या 'दा गुड महाराजा' या आगामी चित्रपटाचं शूटिंगही तिथंच करू इच्छितात.

बॉलीवूड, चित्रपट, कोरोना

फोटो स्रोत, JANEK SKARZYNSKI

फोटो कॅप्शन, पोलंड

प्रसिद्ध प्रॉडक्शन डिझायनर शिऊली ठुकराल यांच्या मते प्रत्येकवेळी भारतातून टीम नेणं शक्य नसतं. अशावेळी स्थानिक युनिटकडून तयारी करून घ्यावी लागते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ज्याठिकाणी काम करायचं आहे तिथली यंत्रणा समजून घेणं असतं.

शिऊली ठुकराल यांनी मिडनाईट चिल्ड्रन्स, कार्तिक कॉलिंग कार्तिक, ओए लक्की! लक्की ओए आणि नुकत्या प्रदर्शित झालेल्या शिद्दत या चित्रपटांसाठी सेट डिझाईन केले आहेत.

जुन्या हिंदी चित्रपटांचा विचार करता चित्रिकरणासाठी युरोपला महत्त्वं दिलं जात होतं, असं पाहायला मिळतं, तर आता निर्माता-दिग्दर्शक कझाकिस्तान, अझरबैजान, दुबई या देशांकडे वळत आहेत.

ट्रेड अॅनालिस्‍ट अतुल मोहन यांच्या मते, तुर्की, कझाकिस्तान, अझरबैजान हे नवे लोकेशन आहेत. इतर ठिकाणं लोकांना आता जुनी वाटू लागली आहेत. अबू धाबी, माल्टामध्येही आता निर्माते जात आहेत.

ठग ऑफ हिंदुस्तानचं शूटिंग माल्टामध्ये झालं होतं. तर खुदा हाफीझ उझबेकिस्तानमध्ये चित्रित करण्यात आला होता.

भारतीय वंशाचे लोक संपूर्ण जगात पसरलेले आहेत. त्यात चांगल्या मोठ्या पदांवर असलेल्यांची संख्या मोठी आहे. बॉलिवूडचे चित्रपट त्यांच्यामध्ये प्रचलित आहेत. तसंच विदेशी वंशाच्या लोकांमध्ये ते हळूहळू जम बसवत आहेत.

'आपले चित्रपट ब्राइट आणि कलरफुल असतात, त्यात गाणी असतात. लोकांना ते खूप आवडतात,' असं अतुल म्हणाले.

चित्रपटाच्या शूटिंगमध्ये लोकेशन किंवा ठिकाणाचं प्रमोशन होतं. त्यामुळं तिथं पर्यटनाला चालना मिळते. तसंच त्यातून स्थानिकांना थेट रोजगारही मिळतो. शूटिंगसाठी आवश्यक असलेलं क्रू, ट्रान्सपोर्ट, हॉटेल याचा त्यात समावेश असतो.

जगातील अनेक देश चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनुदान देतात. उद्योगांशी संलग्न असलेल्या लोकांनुसार कझाकिस्तान, अझरबैजान असे देश 25 टक्के अनुदान देतात. अबू धाबी आणि दुबईही आता सूट देत आहेत. फिजीमध्ये तर सूट 70 टक्के असल्याचं म्हटलं जातं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)