पॉड हॉटेल म्हणजे काय? मुंबई सेंट्रलचं पॉड हॉटेल आतून असं आहे...

पश्चिम रेल्वेनं 'मुंबई सेंट्रल' या रेल्वे स्टेशनच्या इमारतीत आधुनिक संकल्पनेवर आधारित असं पॉड हॉटेल सुरू केलंय.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, पश्चिम रेल्वेनं 'मुंबई सेंट्रल' या रेल्वे स्टेशनच्या इमारतीत आधुनिक संकल्पनेवर आधारित असं पॉड हॉटेल सुरू केलंय.

पश्चिम रेल्वेच्या 'मुंबई सेंट्रल' स्टेशनच्या इमारतीत आधुनिक संकल्पनेवर आधारित पॉड हॉटेल सुरू करण्यात आलं आहे.

खासगी खोली 8 बाय 10 ची आहे. यात तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय व्हावी म्हणून हे पॉड हॉटेल बनवण्यात आलं आहे. यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्सूल रुम म्हणजेच लहान खोल्या आहेत.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, खासगी खोली 8 बाय 10 ची आहे. यात तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सोय व्हावी म्हणून हे पॉड हॉटेल बनवण्यात आलं आहे. यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्सूल रुम म्हणजेच लहान खोल्या आहेत.
यात एसी, फ्रेश एअर वेंट, टिव्ही, चार्जिंग, सेफ लॉकर, स्मोक डिटेक्टर, फायर एक्सटिक्गविशर, मिरर आहेत.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, यात एसी, फ्रेश एअर वेंट, टीव्ही, चार्जिंग, सेफ लॉकर, स्मोक डिटेक्टर, फायर एक्सटिक्गविशर आणि मिरर आहेत.
या पॉड हॉटेलचे दर 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती, 24 तासांसाठी 1999 रुपये प्रति व्यक्ती असणार आहे. या पॉड हॉटेलच्या दरात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, या पॉड हॉटेलचे दर 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती, 24 तासांसाठी 1999 रुपये प्रति व्यक्ती असणार आहे. या पॉड हॉटेलच्या दरात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात.
या पॉड हॉटेलमध्ये वायफाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकुलित रूम, विद्युत दिवे असणार आहे. हवेशीर जागा, डिझाईन असलेल्या नक्षी, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, या पॉड हॉटेलमध्ये वायफाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकुलित रूम, विद्युत दिवे असणार आहे. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
पॉड हॉटेलमध्ये एकूण 48 पॉड (रूम) असणार आहेत. यामधील 30 क्लासिक पॉड, 7 पॉड फक्त महिलांसाठी, 10 खासगी पॉड, एक पॉड अपंगासाठी असणार आहे. यासह पाच शॉवर युनिट देखील असणार आहे. तसेच 4 कुटुंब सदस्य असलेल्या कुटुंबाला देखील निवासासाठी सुविधा तयार केली आहे.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, पॉड हॉटेलमध्ये एकूण 48 पॉड (रूम) असणार आहेत. यामधील 30 क्लासिक पॉड, 7 पॉड फक्त महिलांसाठी, 10 खासगी पॉड, एक पॉड अपंगासाठी असणार आहे. यासह पाच शॉवर युनिट देखील असणार आहे. तसंच 4 कुटुंब सदस्य असलेल्या कुटुंबाला देखील निवासासाठी सुविधा तयार केली आहे.
आयआरसीटीसीने खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूम्सची स्थापना, संचालन आणि व्यवस्थापन 9 वर्षांच्या कालावधीसाठी, आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्यायोग्य कंत्राट दिले आहे.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, आयआरसीटीसीने खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूम्सची स्थापना, संचालन आणि व्यवस्थापन 9 वर्षांच्या कालावधीसाठी तसंच आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्यायोग्य कंत्राट दिलं आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेच्या वतीने पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेल उभारले आहे.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेच्या वतीने पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात हे पॉड हॉटेल उभारलं आहे.
पॉडची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली. जपानमध्ये मोठ्या संख्येने लहान पलंगांच्या गोलाकार खोल्या असलेल्या कॅप्सूल म्हणून ओळखले जातात.

फोटो स्रोत, Shardul kadam/bbc

फोटो कॅप्शन, पॉडची सर्वप्रथम संकल्पना जपान देशात मांडण्यात आली. जपानने येथील प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा मिळावी, यासाठी पॉडची निर्मिती केली. जपानमध्ये मोठ्या संख्येने लहान पलंगांच्या गोलाकार खोल्या असलेल्या कॅप्सूल म्हणून ओळखले जातात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)