अमोल कोल्हे- 'एकांतवासात जाण्याचा निर्णय मी घेतला कारण...'

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Facebook/Amol Kolhe

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनली होती.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं-

"गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय...थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!"

शनिवारी (13 नोव्हेंबर) डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून आपला एकांतवास संपल्याचं म्हटलं.

या एकांतवासात त्यांनी काय विचार केला? मानसिक आरोग्यावर व्यक्त होण्याची त्यांना आवश्यकता का वाटली? मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे ते कसं पाहतात? या सर्व विषयांवर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी डॉ. अमोल कोल्हेंशी संवाद साधला.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

त्याचा संपादित अंश इथे देत आहोत.

तुम्ही कोणत्या मानसिक तणावातून जात होता का?

मानसिक तणावातून जाण्यापेक्षा महत्त्वाचं होतं मानसिक थकवा येणं. सतत जी काही धावपळ सुरू होती, त्यामुळे मला एकदा थांबून त्याकडे पाहणं मला गरजेचं वाटत होतं.

त्यापलिकडे जाऊन आजूबाजूला जे काही बघत होतो, त्यातून या गोष्टीवर व्यक्त होणंही आवश्यक होतं. माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जी पोस्ट केली होती, ती तिच होती...मानसिक थकव्याच्या रिअलाएझेशनसंदर्भात. त्यानंतर दिवसभरात मला इतक्या तरूण मित्रांचे फोन आले, त्यांनी म्हटलं की, बरं झालं तुम्ही या विषयाला वाचा फोडली. आम्हीही यातून जातोय, पण आम्हाला हे नव्हतं व्यक्त होता येत.

तुम्ही मानसिक आरोग्याबद्दल बोलला. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुम्ही कोणती औषधं घेत आहात का?

मी कोणतीही औषधं घेत नाही. मानसिक स्वास्थ्यं आणि मानसिक आजार या दोन वेगवेगळ्या कल्पना आहेत. आपल्याकडे सर्वसाधारण कल्पना अशी आहे की, कोणी मानसिक आरोग्याविषयी बोलायला सुरुवात केली की, याला कोणता मानसिक आजार आहे का, असं वाटतं.

पण मानसिक आरोग्याच्या अलिकडे मानसिक स्वास्थ्य आहे, काऊन्सिलिंग चांगला पर्याय आहे. मात्र आपल्याकडे अजूनही या गोष्टी स्वीकारणं दुरापास्त आहे.

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Facebook/Amol Kolhe

समजा, मी मला काऊन्सिलिंग हवंय असं म्हटलं, तर त्याचा अर्थ आजही असा घेतला जातो की, डोक्यावर परिणाम झालाय. काऊन्सिलिंग हीसुद्धा एक गरज आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. विशेषतः तरूणाईमध्ये या गोष्टींबद्दल जागरुरकता निर्माण होणं खूप खूप आवश्यक आहे.

तीव्र स्पर्धा, न्यूक्लिअर फॅमिली, आपण जे धावत चाललोय, त्यामध्ये व्यक्त होण्याच्या जागा कमी होत चालल्या आहेत, तसं याची गरज निर्माण झाली आहे.

तुम्ही आता तीव्र (कट थ्रोट) स्पर्धेबद्दल बोललात. तुमच्या व्हीडिओमध्येही तुम्ही याबद्दल बोलला होता. तुमच्या राजकीय आयुष्यात तुम्हाला अशा स्पर्धेला सामोरं जावं लागतंय का?

मला वैयक्तिक किंवा राजकीय आयुष्यात कोणतीही स्पर्धा नाही. पण तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं. त्यामुळे जी 'कट थ्रोट' स्पर्धा मी म्हणतो, ती राजकीय आयुष्यात मला नाही. कला क्षेत्रात तुम्ही जी जाणीव करून घेता, त्यावर ती आहे.

नेमके कुठले निर्णय किंवा विचारांचा तुम्हाला फेरविचार करायचा होता?

फेरविचार म्हणजे अगदीच 'यू टर्न' नाही. माझ्या फेरविचाराच्या पोस्टकडे फार नकारात्मक विचारातून पाहण्यात आलं.

मेडिसिटी किंवा बैलगाड्यांच्या संदर्भातील विषय आहे, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. मी सुरुवातीपासून हा विषय मांडत आहे. पण या सगळ्याला विधायक रुप देण्याचा विचार आहे. म्हणजे मेडिसिटी सारख्या संकल्पनेत आणखी काय करता येऊ शकतं. त्यासाठीचे पर्याय याचा धांडोळा म्हणजे फेरविचार म्हणायचं होतं.

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, Facebook/ Amol Kolhe

लोकप्रतिनिधी म्हणून मी दिलेल्या वचनांचाही विचार करायला हवा. मी मांडलेल्या संकल्पना खरंच योग्य आहेत का असा विचार म्हणजे फेरविचार.

काही टोकाचे आणि अनपेक्षित निर्णय घेतले असं तुम्ही एकांतवासाला जाण्यापूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, ते निर्णय कोणते?

मी आधी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काही काळात त्याचा उलगडा होत जाईल. आताच सगळा उलगडा झाला तर मी नंतर काय बोलणार?

'पुरुषांना सांगितलं जातं की रडू नका, कणखर बना,' पण तुम्ही म्हणतात रडायला आलं तर रडूनही घ्या. मग अमोल कोल्हेंना कधी रडायला आलं का आणि त्यांनी रडून घेतलं का?

मी एकांतवासाला जाण्याची पोस्ट टाकल्यानंतर मला मिळालेल्या प्रतिक्रियांमधून मानसिक आरोग्य ही खरंच गरज आहे का? हे अधोरेखित झालं, त्यावर चर्चा झाली. त्यावर विचार मांडताना सर्वांनी व्यक्त व्हावं या अर्थानं मी तसं म्हटलं. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्याशी संबंध नाही.

तुम्हाला एकूणच राजकारणाचा कंटाळा आला आहे, असं वाटत आहे का?

नक्कीच नाही. कारण तसं असतं तर मी तुम्हाला जे भविष्यातील नियोजन सांगितलं तेवढं उत्साहानं बोललोच नसतो.

एकांतवासाच्या पोस्टनंतर तुम्ही राजकारण सोडणार, पक्ष बदलणार अशा चर्चा झाल्या. खरंच तसं आहे का? तुमची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी काही चर्चा झाली का?

मी एकांतवासात जाणार याबाबत शरद पवारांपासून ते जयंत पाटलांपर्यंत राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना माहिती होतं. मी त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. इतरांनी लावलेल्या तर्काचं मी स्पष्टीकरण कसं देणार.

मला भविष्यातील गोष्टींचा विचार करण्यासाठी हे विचारमंथन होतं, आणि त्याचं प्रतिबिंब भविष्यातील कामात दिसेल. त्यामुळं यात राजकीय संन्यास किंवा पक्षांतर असं काहीही नाही.

गेल्या काही दिवसांतील चर्चा किंवा कंगनानं स्वातंत्र्याबाबत केलेलं वक्तव्य पाहता इतिहास नव्यानं मांडण्याचा प्रयत्न दिसतो. तुम्हीही ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहे. अशा परिस्थितीत अभिनेते म्हणून तुम्ही या सर्वाकडे कसं पाहता?

असं बोलण्याचं धाडस कुठून येतं, याबाबत त्या बाईंना माझा सलाम आहे. अशी वक्तव्यं करण्याची बुद्धी कशी सुचते याचं कौतुक वाटतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

लाखो देशभक्तांनी प्राणाहुती दिली. त्या सर्वांच्या त्यागांचा केवळ एखाद्या विशिष्ट हेतूनं अपमान करत असाल, तर अभिनयासारख्या संवेदनशील क्षेत्रात काम करण्यासाठी आपण सक्षम आहोत का? असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे.

असं सातत्यानं होत असेल तर वस्तुनिष्ट पद्धतीनं गोष्टी मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा विधानांद्वारे पुढच्या पिढीसमोर एक वेगळं चित्र मांडलं जाईल आणि ते स्वीकारलंही जाईल. यातून संपूर्ण देशात एकप्रकारे असहिष्णुता वाढत चालली आहे.

अशा ऐतिहासिक गोष्टी जेव्हा पुढं येतात, त्याचा राजकीय फायदा घेण्याचा किती प्रयत्न होईल?

यातून टीकेसाठी वापर करता येऊ शकतो. पण महाराष्ट्राला वेगळी आणि सक्षम वैचारिक बैठक आहे. त्यामुळं अशा आभासी गोष्टींचा त्यावर परिणाम होईल, असं मला वाटत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)