आरोग्य विभागाची ऑक्टोबर 2021 मध्ये झालेली परीक्षा रद्द, राजेश टोपेंची माहिती

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

आरोग्य विभागाची गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 ला पार पडली. आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे.

राज्याचे मावळते आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं की, "सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत 24 ऑक्टोबर 2021 व 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

"या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा पोलीस तपास सुरू असून या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन या दोन्ही संवर्गातील परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात येणार आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"झालेल्या निर्णयानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना विहित परीक्षा शुल्क व इतर नियम अटी लागू राहणार आहेत. लवकरच नव्याने परीक्षा घेऊन गट क आणि ड संवर्गातील पदे भरती करण्यात येतील," असंही टोपे म्हणालेत.

परीक्षा आणि वाद

आरोग्य विभागाच्या या दोन्ही परीक्षांदरम्याम उमेदवारांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र होतं. 24 तारखेच्या परीक्षेत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींनी तक्रारी केल्या होत्या.

अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका उशीराने पोहचल्याची तक्रार आहे. तसंच काहींनी प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच वॉट्सअपवर व्हायरल झाल्याची पोलीस तक्रार केली होती.

परीक्षार्थीचं पत्र

फोटो स्रोत, viral photo

फोटो कॅप्शन, परीक्षार्थीचं पत्र

31 ऑक्टोबरच्या परीक्षेबाबतही संभ्रम निर्माण झाला असून प्रश्न टेलिग्रामवर आधीच प्रसिद्ध झाल्याचा दावा एमपीएससी समन्वय समितीने केला होता. याबाबत त्यांनी पुणे पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.

दरम्यान, आरोग्य विभागाने 31 ऑक्टोबरची परीक्षा सुरळीत पार पडल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा दावा

31 ऑक्टोबरला पार पडलेल्या गट 'ड' च्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच लीक झाल्याचा दावा काही उमेदवारांकडून करण्यात आला होता. 

यापूर्वी 24 ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाच्या गट क ची प्रश्नपत्रिका सुद्धा परीक्षेआधीच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली होती. 

पण, दुसऱ्या बाजूला परीक्षा सुरळीत पडली असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं होतं. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण 3462 पदं भरण्यासाठीची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबरला पार पडली. 

राज्यातील 1364 केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी 4 लाख 61 हजार 497 उमेदवारांनी अर्ज केले होते तर 4 लाख 12 हजार 200 उमेदवारांनी प्रवेशपत्र घेतले होते. 

आधी परीक्षा रद्द, मग पुन्हा नवीन वेळापत्रक

आरोग्य विभागाची प्रलंबित भरती परीक्षा सप्टेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात आली. ग्रुप 'क' आणि 'ड'साठी ही परीक्षा होणार होती. परंतु परीक्षेच्या काही तास आधी आरोग्य विभागाने ही परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं.

राज्यभरातील उमेदवार यामुळे निराश झाले. सरकारी भरती प्रक्रियेला आगोदरच विलंब होत असताना ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने गोंधळ उडाला.

मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते. त्यामुळे आरोग्य विभागावर टीका झाली.

ही परीक्षा पुढे ढकलून 24 ऑक्टोबरला घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. 24 ऑक्टोबरलाही विविध परीक्षा केंद्रांमधून उमेदवारांच्या तक्रारी समोर आल्या.

आरोग्य विभागाच्या या भरतीसाठी परीक्षा घेण्याचं कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. या गोंधळानंतर आरोग्य विभागाने आता या कंपनीला नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

पण, सप्टेंबर महिन्यात ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यानंतर आणि त्यावेळी परीक्षा सुरळीत घेता आली नसल्याने पुन्हा याच खासगी कंपनीला कंत्राट का दिलं? असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)