शरद पवार : लखीमपूर खिरीमधील घटना 'जालियनवाला बाग'सारखीच

लखीमपूर खिरी

फोटो स्रोत, AnantZanane

    • Author, अनंत झणाणे
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

लखीमपूर खिरीमध्ये घडलेली घटना जालिनवाला बाग हत्याकांडासारखी असल्याचं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.

"लखीमपूर खिरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची हत्या झाली त्याची जबाबदारी पूर्णपणे यूपी सरकारची आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेतून सरकारची वृत्ती कळते. केंद्र आणि यूपी सरकार असंवेदनशील आहे," अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात त्यांना यश येणार नाही, असंही पवार यांनी म्हंटलंय.

या घटनेची जबरदस्त किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.

तर लखीमपूरची घटना लांछनास्पद असल्याचं शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय. या घटनेमुळे आम्ही अस्वस्थ आहोत. याबाबत मी राहुल गांधींशी चर्चा केल्याचंसुद्धा संजय राऊत यांनी सांगितलंय.

चिरडण्याचा कथित व्हीडिओ व्हायरल

लखीमपूर खिरीमधल्या तिकुनियामध्ये झालेल्या घटनेचा तथाकथित व्हीडिओ व्हायरल झालाय.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रांनीही एक व्हीडिओ ट्वीट केलाय. हा व्हीडिओदेखील व्हायरल झालेला आहे.

हा व्हीडिओ ट्वीट करत प्रियांकांनी म्हटलंय, "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डर वा FIR शिवाय गेल्या 28 तासांपासून अटकेत ठेवलंय. अन्नदात्याला चिरडणाऱ्या या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही. असं का?"

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तिकुनियामध्ये जिथे ही घटना घडली, तिथला हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जातंय. रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्याला लोकांना चिरडून एक थार (Thar) जीप वेगाने पुढे जात असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतं. या जीपमध्ये काही लोक बसल्याचंही व्हीडिओत दिसतं.

या जीपच्या मागून एक फॉर्च्युनर गाडी येताना दिसते. आपलं म्हणणं या व्हीडिओमुळे सिद्ध होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण पोलीस या व्हीडिओचा त्यांच्या तपासात समावेश करून घेतात का, हे आता पाहायला हवं.

सोमवारी रात्री व्हॉट्सअॅप आणि फेसबुक बंद पडल्याने हा व्हीडिओ तितकासा पसरला नव्हता. पण मंगळवार ( 5 ऑक्टोबर) सकाळपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

तर लखीमपूर खिरीमधली इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.

राहुल गांधींचं ट्वीट

लखीमपूर खिरीला जायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रांना ताब्यात घेण्यात आलं. प्रियांका एक सच्च्या काँग्रेस नेत्या असून त्या डगमगणार नाहीत, असं ट्वीट काँग्रेस नेते आणि प्रियांकांचे भाऊ राहुल गांधींनी केलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तरूण शेतकऱ्यांवर होणार अंत्यसंस्कार

लखीमपूरमधल्या पलिआमध्ये 19 वर्षांच्या लवप्रीतवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लवप्रीतच्या वडिलांची बीबीसी प्रतिनिधीने सोमवारी रात्री संवाद साधला. आपला मुलगा शिकायला ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी करत होता आणि लखीमपूरमध्ये IELTS चा अभ्यास करत होता, असं त्यांनी सांगितलं.

लखीमपूर खिरी

फोटो स्रोत, ANI

तर 18 वर्षांच्या गुरजिंदरचे कुटुंबीय सोमवारी रात्री उशीरा त्याचा मृतदेह घेऊन नानपाराला परत गेले. गुरजिंदरला न्याय मिळायला हवा असा आक्रोश त्याची बहीण करत होती.

भाजप कार्यकर्त्याचाही मृत्यू

25 वर्षांचे भाजप कार्यकर्ते शुभम मिश्रांचाही या घटनेत मृत्यू झाला.

ज्या तीन गाड्यांनी शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय, त्यापैकी एका गाडीत शुभम होते.

शुभमवर शिवपुरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे वडील फार काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. शुभम भाजपचा बूथ इन्चार्ज होता आणि स्थानिकांमध्ये लोकप्रिय होता असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

शुभमला एंजल नावाची 1 वर्षांची मुलगी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)