You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इडली की कुल्फी? व्हायरल फोटोनंतर सोशल मीडियावर वाद...
एखाद्या कुल्फीप्रमाणे लाकडी काडीवर लावून करण्यात आलेल्या इडलीचा फोटो गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे.
पण या फोटोनंतर सोशल मीडियावर 'फुड वॉर' पेटल्याचं दिसून येत आहे.
लोक उत्स्फूर्तपणे आणि अत्यंत स्पष्टपणे या फोटोंबाबत मत व्यक्त करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये इडली ही एका आईस-क्रीम स्टीकवर (लाकडाची काडी) बनवण्यात आलेली आहे. यामध्ये तीन इडल्यांच्या स्टीक्स एका ताटात ठेवलेल्या आहेत. तर एक इडली स्टीक सांबारात बुडवलेली आहे. बाजूला आपल्या सर्वांच्या आवडीची खोबऱ्याची चटणी ठेवलेली असल्याचं या फोटोत दिसतं.
मात्र या फोटोसंदर्भात लोकांचं मत-मतांतरं असल्याचं त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्यास कळून येईल.
काहींनी इडलीला आईसक्रीमच्या काडीवर चिकटवण्याच्या सृजनशीलतेचं कौतुक केलं. तर काहींना ही इडली रुचली नाही. त्यांनी कटू शब्दांमध्ये ही डिश बनवणाऱ्यांवर टीका केली आहे.
हा फोटो कर्नाटकची राजधानी बंगळुरु इथला असल्याचं सांगितलं जात आहे.
महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सर्वप्रथम हा फोटो ट्वीट केला होता.
ते म्हणाले, "भारतात नाविन्यपूर्ण संशोधनांची राजधानी असलेल्या बंगळुरुत इडलीबाबतची ही सृजनशीलता. काडीवर चिकटवलेली इडली. सांभार आणि चटणी तोंडी लावू खायची. याच्या समर्थनात कोण आणि विरोधात कोण आहे?
यावर प्रतिक्रिया देताना मायक्रो-अॅम्बिशियस अकाऊंट युझरने म्हटलं, "फक्त एक प्रश्न, का?"
याच्या समर्थनार्थही एकाने प्रतिक्रिया दिली.
महेंद्र कुमार नामक युझर म्हणतात, "इडली आईसक्रीमच्या काडीवर कशी बनवण्यात येईल, त्याचं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान. बंगळुरूत आहाराबाबत संशोधनाचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत."
पण आशिष कुमार या युझरने म्हटलं,
"कृपा करून इडली तरी यातून सोडून द्या. डोशांबाबत तुम्ही आधीच भेळ-मिसळ केलेली आहे. तथाकथिक क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली इडलीचं अस्तित्व मिटवू नका," असं ते म्हणाले.
व्हर्चुअल सिडने म्हटलं, "पावभाजीनंतर आणखी एक विचित्र पाऊल.."
लेफ्टनंट होरॅटिओ यांनी म्हटलं, "बरं दिसतंय, हात, चमचे वापरण्याची गरज नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)