मुस्लीम वृद्ध नागरिकाला मारहाणीच्या व्हायरल व्हीडिओप्रकरणी ट्वीटर आणि पत्रकारांवर गुन्हे दाखल

अब्दुल समद

फोटो स्रोत, YT

    • Author, दिलनवाझ पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सामाजिक शांततेचा भंग केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर तसंच काही पत्रकारांवर गुन्हे दाखल केले आहेत.

एका मुस्लिम वयोवृद्धावर 5 जून रोजी झालेल्या हल्ल्याबाबत ही कारवाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा FIR दाखल झाल्याच्या वृत्ताला बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांच्याशी बोलताना गाझियाबाद पोलिसांनी दुजोरा दिलाय.

तपास अधिकारी अखिलेश कुमार मिश्र यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या प्रकरणाचा तपास जारी आहे. एफआयआर दाखल केला जाऊ शकतो. व्हीडिओ एडिट करणारी व्यक्ती आणि व्हीडिओ व्हायरल करणारी व्यक्ती यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाऊ शकतो. खोटा जवाब नोंदवल्याप्रकरणी खटला दाखल केला जाऊ शकतो.

उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी दाखल केलेल्या खटल्यात ट्वीटर, ट्वीटर कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद झुबैर, पत्रकार राणा आयुब, वेबसाईट द वायर, पत्रकार सबा नकवी, काँग्रेस नेता मस्कूर उस्मानी, सलमान निजामी, डॉ. शमा मोहम्मद यांचा समावेश आहे.

एडिट केलेला व्हीडिओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हीडिओत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलं असल्याचं चित्रण आहे.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता 153, 153अ, 295अ, 505, 120ब, 34अ अंतर्गत या सर्वांविरोधात तक्रार दाखल केला आहे. पोलीस इन्स्पेक्टर नरेश सिंह यांच्या तक्रारीसंदर्भात हा खटला दाखल करण्यात आला आहे. ट्वीटरने यासंदर्भात माहिती नसल्याचं म्हटलं आहे. भारतातील ट्वीटरचे प्रवक्ते म्हणाले, ट्वीटर गुन्ह्यासंदर्भात अधिकृत भाष्य करत नाही. आम्हाला यासंदर्भात माहिती मिळालेली नाही.

एफआयआर

एफआयरमध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रार दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित लोकांनी घटनेची सत्यासत्यता न तपासता घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. समाजातील शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नातून हा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला.

हा व्हीडिओ व्हायरल करण्यामागच्या षडयंत्राचा पोलीस तपास करत आहेत.

उत्तर प्रदेश, मुस्लीम वृद्ध नागरिक, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, एफआयआर

ट्वीटर सोशल मीडिया कंपनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट आहे. भारतातल्या आयटी अक्टची कलमं ट्वीटरला लागू होतात. मात्र भारतातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारत सरकारने ट्वीटरला दिलेली सुरक्षा परत घेतली आहे.

सरकारने नव्या नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना अनुपालन अधिकारी नियुक्त करण्यास सांगितलं आहे. सरकारच्या मते ट्वीटरने अद्याप तरी अशा अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.

यासंदर्भात केंद्र सरकारकडून आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही असं ट्वीटरने म्हटलं आहे. ट्वीटरने भारतात कंप्लायन्स अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

आयटी कायद्याची कलमं लागू होणं बंद झाल्यानंतर ट्वीटरचा इंटरमीडिएट प्लॅटफॉर्मचा अधिकारही संपुष्टात आला. ट्वीटरवर मांडल्या जाणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

एफआयआरमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीटरला संबंधित व्हीडिओ हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र कंपनीने यासंदर्भात कार्यवाही केलेली नाही.

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्वीटरला आपली भूमिका मांडण्यासाठी पुरेशा संधी देण्यात आल्याचं म्हटलं आहे. ट्वीटरने केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं पालन केलेलं नाही. 26 मे रोजी ही नियमावली लागू झाली आहे.

रवी शंकर प्रसाद म्हणाले, "भारताचा आकार जसा खंडप्राय तसंच देशाची संस्कृती विविधांगी आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या प्रक्षोभक गोष्टीमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. फेक न्यूजसंदर्भात हा धोका अधिकच आहे. इंटरमीडियरी गाईडलाईन्स लागू करण्याचं प्रमुख कारण हेही होतं".

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

उत्तर प्रदेशच्या घटनेचा उल्लेख करताना ते म्हणाले, "उत्तर प्रदेशात जे घडलं ते फेक न्यूजसंदर्भात लढण्यात ट्वीटरच्या मनमानीचं उदाहरण आहे. ट्वीटर स्वत:च्या फॅक्टचेक प्रणालीबाबत अतिउत्साही आहे. मात्र उत्तर प्रदेशात जे घडलं त्यावेळी कारवाई करण्यात ते अपयशी ठरलं आहे. फेक न्यूजशी लढण्यात त्यांची असमर्थतता दिसून येते".

ट्वीटरने बीबीसीला सांगितलं की, आम्ही अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात भारत सरकारला माहिती दिली जाईल. नव्या नियमावलीचं पालन करण्याचे आमचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत कोणाचीही चौकशी नाही

तपास अधिकारी अखिलेश कुमार मिश्र यांनी बीबीसीला सांगितलं की, "व्हीडिओ व्हायरल करण्यासंदर्भात आरोपींची चौकशी केली जाईल आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटकही होऊ शकते.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

या खटल्यासंदर्भात आरोपींना कल्पना देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आरोपींचा शोध घेत आहेत. पत्रकार आणि ट्वीटर कंपनीवर धार्मिक भावना भडकावल्याचा तसंच षडयंत्र रचल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे".

एफआयआर दाखल झाल्यानंतर पत्रकार मोहम्मद झुबैर यांनी आपलं ट्वीट डिलिट केलं आहे.

त्यांनी ट्वीटरवर लिहिलं की, "मी जे व्हीडिओ पोस्ट केले होते ते डिलिट केले आहेत. पीडित व्यक्तीने जबरदस्तीने जय श्रीराम वदवून घेतल्याचा दावा केला होता. याला पोलीस अधिकाऱ्यांकडून तसंच वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी माझ्याशी झालेल्या चर्चेवरून दुजोरा मिळू शकलेला नाही".

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

राणा आयुब यांनीही आपलं ट्वीट डिलिट केलं आहे. त्या लिहितात, "मी अब्दुल यांच्यावर हल्ल्यासंदर्भात जे ट्वीट केलं होतं ते एक व्हीडिओ आणि प्रसिद्ध झालेल्या बातमीवर आधारित होतं. हे सगळं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रकाशित आणि प्रसारित झालं होतं.

पोलिसांच्या तपासाचा विषय आहे त्याबाबत दुसरं नरेटिव्ह सादर करण्यात आलं आहे. मी सत्य सर्वांसमोर येण्याची प्रतीक्षा करेन. ज्या बातम्या खऱ्या असतात त्या मी शेअर करते. जेणेकरून समाजात शांतता आणि सौहार्दाची भावना वाढीस लागेल. पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याची मी वाट पाहीन".

गाजियाबादमधल्या लोणी इथे काय घडलं होतं?

वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी परवेश गुर्जर, कल्लू आणि आदिल यांना अटक केली होती. बाकी आरोपांचा शोध सुरू आहे.

एका व्हायरल व्हीडिओत असं दिसतं की, समद सैफी रिक्षातून जात असताना त्यांचं काही लोकांनी अपहरण केलं. त्यांना मारहाण केली. दाढी कापण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून जबरदस्तीने जय श्रीरामच्या घोषणा वदवून घेतल्या. ही घटना 5 जूनची आहे.

7 जून रोजी समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते इदरीश पहलवान यांच्याबरोबर केलेल्या फेसबुक लाईव्हदरम्यान समद सैफी यांनी सांगितलं की मारहाण करणाऱ्य युवकांना ते ओळखत नाहीत.

वृद्धाच्या मारहाणाची आणखी एक व्हीडिओही व्हायरल झाला. एक तरुण वृद्ध व्यक्तीची दाढी कापताना दिसत आहे मात्र या व्हीडिओत आवाज नाहीये.

उत्तर प्रदेश, मुस्लीम वृद्ध नागरिक, सोशल मीडिया

फोटो स्रोत, UP POLICE

फोटो कॅप्शन, व्हायरल व्हीडिओप्रकरणी तपास सुरू आहे.

गाजियाबाद पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे की वृद्ध व्यक्ती आरोपींना आधीपासून ओळखत होते.

गाजियाबाद पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, वृद्ध नागरिकाला मारहाण आणि व्हायरल व्हीडिओसंदर्भात परस्परसंबंधाबाबत हे कळलं आहे की वृद्ध व्यक्ती 5 जून रोजी बुलंदशहरहून बेहटा, लोणी इथे गेला होता. तिथून अन्य एका माणसाच्या बरोबर मुख्य आरोपी परवेश गुर्जरच्या घरी बंथला, लोणी इथे गेले होते. परवेशच्या घरासमोर अन्य काही मुलं ज्यामध्ये कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहिद यांचा समावेश होता. त्यांनी परवेशच्या बरोबरीने वृद्धाला मारहाण करायला सुरुवात केली.

समद तावीज बनवण्याचं काम करतात आणि त्यांनी मुख्य आरोपी परवेशलाही तावीज बनवून दिला होता.

यासंदर्भात वृद्ध व्यक्तीशी बोलणं होऊ शकलं नाही. खूप प्रयत्नांनंतरही त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याशी बोलणं होऊ दिलं नाही. ते आजारी असल्याचं घरच्यांनी सांगितलं. त्यांच्यावर अलीगढ इथे उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. त्यांचा मुलगा तैय्यब सैफी यांनी मंगळवारी पुन्हा तेच आरोप केले. धार्मिक घोषणा द्यायला लावल्या याचा उल्लेख केला नाही.

व्हीडिओचा तपास

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गाजियाबाद पोलिसांना अदयाप मूळ व्हीडिओ मिळालेला नाही.

तपास अधिकारी अखिलेश मिश्र यांनी बीबीसीला सांगितलं की, आमच्याकडे मूळ व्हीडिओ नाही. आम्ही तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा व्हीडिओ कोणी एडिट केला हे कळू शकलेलं नाही. व्हीडिओ करणारा आणि तो एडिट करणाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू.

वृद्ध नागरिकाला मारहाण केलेल्या आरोपींनीच हा व्हीडिओ तयार केल्याचं समजलं आहे असं पोलिसांनी सांगितलं.

समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते इदरीश पहलवान यांनी सैफी यांच्याबरोबर 7 जून रोजी केलेल्या फेसबुक लाईव्हदरम्यान सैफी यांनी मारहाण झाल्याचा आणि धार्मिक घोषणा सक्तीने द्यायला लावल्याचं म्हटलं होतं.

मीच सगळ्यात आधी हा मुद्दा सगळ्यांसमोर आणला असं इदरीश पहलवान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र आता इदरीश यांनी आपला फोन बंद केला आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

दरम्यान आपली दाढी कापण्यात आली आणि 'वंदे मातरम' आणि 'जय श्रीराम' म्हणण्याची बळजबरी करण्यात आल्याचा दावा अब्दुल समद नावाच्या एका वयोवृद्ध व्यक्तीने व्हिडिओद्वारे केला होता.

आपल्याला जंगलात नेऊन बांधून ठेवण्यात आल्याचा आरोपही अब्दुल समद यांनी केला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

पण या घटनेला अशाप्रकारचा कोणतीहा धार्मिक संदर्भ नसल्याचं गाझियाबाद पोलिसांनी म्हटलंय. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये आरोपी म्हणून पत्रकार राणा अयबू, सबा नक्वी आणि मोहम्मद झुबैर यांची नावं आहेत.

यासोबतच ऑनलाईन न्यूज वेबसाईट 'द वायर', काँग्रेस नेते सलमान निजामी, समा मोहम्मद आणि मस्कूर उस्मानी यांनाही आरोपी करण्यात आलेलं आहे.

सत्यतेची पडताळणी न करता या घटनेला धार्मिक रंग देण्याचा आरोप या सगळ्यांवर करण्यात आलाय.

सामाजिक स्थैर्याला धक्का पोहोचवणं हे या ट्वीट्सचं उद्दिष्टं होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही ट्वीट्स हजारो वेळा री-ट्वीट करण्यात आल्याचं FIR मध्ये म्हटलंय.

पोलिसांकडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतरही ही ट्वीट्स डिलीट करण्यात आली नाहीत आणि ट्वीटरनेही याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचं पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरच्या विरोधातही तक्रार दाखल केली असून केंद्र सरकारने नवे नियम आणल्यानंतरचा ट्विटरच्या विरोधातला हा पहिला खटला आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या ट्विटरला केंद्र सरकारने 5 जून रोजी नवीन नियमांबद्दल सांगत हे नियम लागू करण्याबाबत सांगितलं होतं.

हे नियम आठवडाभरात लागू करायचे होते, पण हा कालावधी संपुष्टात आलाय. 'द हिंदू' वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमुसार ट्विटरचा 'मध्यस्थ' म्हणजेच Intermediary हा दर्जा संपुष्टात आणला जाऊ शकतो. आता कोणत्याही प्रकारच्या मजकुराची जबाबदारी ट्विटरची असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)