सुशील कुमारला अटक, सागर राणा मृत्यूप्रकरणी कारवाई

युवा पैलवानाच्या मृत्यूप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केल्याचं स्पेशल सेलचे पोलीस कमिशनर नीरज ठाकूर यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शनिवारी संध्याकाळपासून सुशीलच्या अटकेसंदर्भात उलटसुलट बातम्या समोर येत होत्या.
रविवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारच्या अटकेच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. दिल्ली पोलिसांचं पथक पंजाबमध्ये असल्याचं दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र तासाभरातच सुशीलला अटक केल्याचं स्पेशल सेलच्या कमिशनरांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी सांगितले की सुशील कुमारला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली. बीबीसी हिंदीचे सहकारी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांनी सांगितलं की एसीपी अत्तर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली इंस्पेक्टर करमबीर सिंह यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईमध्ये सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला देखील अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
सागर राणा या पैलवानाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला फरार घोषित केलं होतं, त्याचा पत्ता सांगणाऱ्याला एक लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं.
4 मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, ANAND
दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.
पण सुशीलचा तपास लागत नसल्यानं आता त्याला पकडून देणाऱ्यास इनाम जाहीर केलं आहे. तसंच आणखी एक आरोपी अजयही फरार असून. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे.
सागर राणा हरियाणाच्या सोनीपतचा राहणारा होता. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांमध्ये झटापट झाली आणि त्यात सागर राणाचा मृत्यू झाला. पैलवान सुशील कुमार आणि त्याच्या सोबत्यांचा यात हात असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळल्याचं FIR मध्ये म्हटलंय.
न्यायालयाने सुशीलला अटकपूर्व जामीन नाकारला होता.
सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. साहजिकच त्याच्यावर झालेल्या आरोपांनी कुस्तीविश्वाला हादरे बसले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








