NEET PG Exam: 'कोरोना संकटात ड्यूटी करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य'

फोटो स्रोत, Getty Images
केंद्र सरकारने एमबीबीएसनंतर पीजीसाठी होणारी नीट प्रवेश प्रक्रिया म्हणजे NEET-PG किमान चार महिन्यांसाठी स्थगित केली आहे.
कोरोना आरोग्य संकटात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने पीएमओच्या हवाल्याने सांगितलं, "शंभर दिवस कोव्हिडसाठीची ड्यूटी पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना आगामी सरकारी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या निर्णयामुळे मोठ्या संख्येने अनुभवी डॉक्टर कोव्हिड सेंटर्स आणि हॉस्पिटल्समध्ये सक्षमपणे ड्यूटी करू शकतील असाही विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
इंटर्न डॉक्टरांसाठीही एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. आपल्या विभाग प्रमुखांच्या देखरेखीअंतर्गत इंटर्न डॉक्टरांना कोव्हिड वॉर्डमध्ये ड्यूटी देण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीएससी आणि जीएनएम पात्रताधारक नर्स यांनाही आता कोव्हिड वॉर्डमध्ये पूर्णवेळ ड्यूटी करता येणार आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गतच ड्यूटी करू शकतील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








