कोरोनाबाधित पतीच्या निधनानंतर पत्नीची 3 वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या

कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर संसार कसा चालवायचा या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.
या दाम्पत्याला आणखी दोन मुलं आहेत. सध्या ही मुलं त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहेत.
बुधवारी पती हणमंतू कडम (39) यांचं निधन झालं. त्यानंतर पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नी पद्मा कडम (35) या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. लोहा शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे भटक्या समाजावर उपासमारीची वेळ
लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे तेलंगणमधील अम्मापुरम येथून उदरनिर्वाहासाठी आलेले एक कुटुंब, दररोज चटई विकून व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असत.

फोटो स्रोत, BBC Sport
पालात राहणाऱ्या या कुटुंबाला रोजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागायचा. त्यातच लॉकडाऊनचे निर्बंध कडक केल्यामुळे संसार कसा चालवायचा असा प्रश्न कडम कुटुंबीयांपुढे होता. रोजच्या संघर्षातच घरातल्या कर्त्या पुरुषालाच कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यानंतर सगळे कुटुंब संकटात सापडले.
पती हनुमंत शंकर कडम हे पॉझिटिव्ह आल्यानंतर लोहा येथील कोव्हिड सेंटर येथे दाखल झाले. तीन दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही बातमी पत्नीला कळताच तीन वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेने पालाजवळ असलेल्या सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबात असलेली सिद्धू (6 वर्ष) आणि अलकिया (7 वर्ष) ही दोन भावंडं आता नातेवाईंकांसोबत राहत आहेत.
चिन्नना दुर्गना कडम (39) रा. संतोषनगर, निजामाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
(या बातमीसाठी लोह्याहून गौतम कांबळे यांनी माहिती पाठवलेली आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








