दत्ता इस्वलकर यांचं निधन, जेजे रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

फोटो स्रोत, facebook
गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांचं आज (7 एप्रिल) निधन झालं. ते 71 वर्षांचे होते.
तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'दोन दिवसांपूर्वीच त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्यांची कोव्हिडची चाचणी निगेटिव्ह आली होती. दोन वर्षांपासून ते आजारी होते, मात्र शेवटपर्यंत काम करत होते. मॉडर्न मिल कंपाऊंडमध्येच ते राहत होते. पूर्वी ते तिथेच नोकरी करायचे,' अशी माहिती त्यांचे सहकारी गजानन खातू यांनी दिली.
कोण होते दत्ता इस्वलकर?
दत्ता इस्वलकर हे मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते होते. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन विशेष गाजलं होतं. त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चांना गिरणी कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत असे.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी ट्वीट करून ' भावपूर्ण श्रद्धांजली' असं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही दत्ता इस्वलकर यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी ट्वीट करून म्हटलं, "गिरणी कामगार दत्ता इस्वलकर यांचं अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झालं. त्यांच्या कुटुंबीयांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व त्यांच्या पवित्र देहास मुक्ती प्राप्त होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करून इस्वलकर यांना आदरांजली वाहिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
"गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन. कालपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे. जे. इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी 5.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मन:पूर्वक आदरांजली," असं वागळे म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)