सीधी बस अपघात: कालव्यात बस पडून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 45 वर

सीधी

फोटो स्रोत, BBC Sport

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कालव्यात बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात 45 प्रवाशांनी आपली जीव गमावला आहे. तर सात जणांचा वाचवण्यात यश आले आहे.

अपघातातून सात जणांना वाचवण्यात यश आल्याचे माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. पहाटे 7.30 वाजता झालेल्या या अपघातात जवळपास 60 प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली होती.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. घटनास्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिकादेखील पाठवण्यात आल्या होत्या. आता बचावकार्य संपले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

बचावकार्य संपले असून या दुर्घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला आहे असे ट्वीट शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यामधील एका कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एक लाख घरांच्या लाभार्थ्यांसोबत अमित शाह सकाळी 11 वाजता संवाद साधणार होते.

चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले. कालवा 22 फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली होती.

क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)