दिशा रवी : भाजप खासदार पीसी मोहन यांच्याकडून दिशा रवीची कसाबसोबत तुलना

फोटो स्रोत, Social Media Viral Image
भाजपचे वरिष्ठ नेते आणि बंगळुरू सेंट्रल मतदारसंघाचे खासदार पीसी मोहन यांनी पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीची तुलना मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात पकडल्या गेलेल्या पाकिस्तानी कट्टरपंथी मोहम्मद अजमल आमीर कसाबसोबत केली आहे.
पीसी मोहन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, "बुऱ्हान वानीही 21 वर्षांचा होता. अजमल कसाबही 21 वर्षांचा होता. वय हा केवळ आकडा असतो. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. गुन्हा हा कायम गुन्हाच असतो."
या ट्वीटसोबतच त्यांनी #disharavi हा हॅशटॅग वापरला आहे आणि दिशा रवीचा फोटोही त्यांनी वापरला आहे.

फोटो स्रोत, Twitter
पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, "कोणत्याही अपराधाचा संबंध वयाशी किंवा व्यक्तीच्या लिंगाशी थोडाच असतो? राजीव गांधी हत्याकांडात सहभागी झालेल्या महिलांचं वयही कथितरित्या 17 की 24 असंच होतं. निर्भयावर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्यांपैकी एक जण 17 वर्षांचा होता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दिल्लीतील एका न्यायालयानं 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बंगळुरूमधील ज्येष्ठ पत्रकार इमरान कुरैशी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिशाला शनिवारी (13 फेब्रुवारी) दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं 'टूलकिट' प्रकरणी अटक करण्यात आली होती.
दिशानं बंगळुरूमधील एका खाजगी कॉलेजमधून बीबीएची पदवी घेतली आहे आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.

फोटो स्रोत, DISHA RAVI / FACEBOOK
शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी बनवलेलं एक वादग्रस्त टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी दिशा यांच्यावर ठेवला आहे.
बंगळुरूमधील एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना म्हटलं की, दिशा यांना टूलकिटबद्दल चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
रविवारी (14 फेब्रुवारी) दिल्ली पोलिसांचे एपीआरओ अनिल मित्तल यांनी म्हटलं की, "जे लोक टूलकिट एडिट करत होते, दिशा त्यांच्यापैकी एक होत्या."
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं?
दिल्ली पोलिसांच्या सायबर टीमनं अटक केलेल्या दिशा रवी या त्या टूलकिटच्या एडिटर आहेत. ते टूलकिट तयार करण्याचा आणि सोशल मीडियावर सर्क्युलेट करण्याचा आरोप दिशा यांच्यावर आहे, असं दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे.
ज्या व्हॉट्स अप ग्रुपवर टूलकिट बनविण्याचं काम होत होतं, तो दिशा रवी यांनीच बनविला असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. टूलकिटचा अंतिम मसुदा बनविणाऱ्या टीमसोबत त्या काम करत असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "या प्रक्रियेत दिशा आणि त्यांच्या साथीदारांनी खलिस्तान समर्थक 'पोएटिक जस्टिस फाउंडेशन' नावाच्या संस्थेसोबत काम केलं, जेणेकरून द्वेष पसरवला जाईल. दिशा यांनी ते 'टूलकिट' नंतर ग्रेटा थनबर्गसोबत शेअर केलं. त्यानंतर दिशा यांनीच ग्रेटाला त्यातील काही मजकूर सोशल मीडियावरून हटवायला सांगितला. कारण त्यातला काही भाग हा सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागला होता."
सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या 'टूलकिट'ची दखल घेत एफआयआर दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी 4 फेब्रुवारीला दिली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दिल्ली पोलिसांच्या मते 26 जानेवारीला झालेला हिंसाचार सुनियोजित होता, ज्यामध्ये या टूलकिटचाही मोठा वाटा होता.
दिल्ली पोलिसांच्या मते या टूलकिटमध्ये भारताच्या विरोधात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक लढा पुकारण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
मोबाईल आणि लॅपटॉप जप्त
दिशा रवी यांना पाच दिवसांपर्यंत ताब्यात ठेवलं जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. या दरम्यान त्यांची चौकशी करण्यात येईल. पोलिसांनी त्यांचा मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. त्याचाही तपास केला जाईल.

फोटो स्रोत, EPA
काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं की, ते टूलकिटवर काम करणाऱ्या लोकांची माहिती जमा करण्यासाठी गुगलशी संपर्क साधणार आहोत.
दिल्ली पोलिसांनी आपल्या एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्गचं नावही घेतलं असल्याची अफवाही काही दिवसांपूर्वी पसरली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये कोणाचंही नाव नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल केल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं होतं.
'सरकारनं कार्यकर्त्यांना लक्ष्य करू नये'
'कोलेशन फॉर एन्व्हायरमेन्टल जस्टिस इन इंडिया' नावाच्या संस्थेनं दिशा यांच्या अटकेनंतर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
या संस्थेनं म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं तरूण आणि पर्यावरण कार्यकर्त्यांना लक्ष्य करू नये. देशातील पर्यावरण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्द्यांवर सरकारनं लक्ष द्यावं.
संस्थेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "दिशा रवी यांची अटक न्यायाला धरून नाही. दिल्ली पोलिस नियमांचा मान ठेवत नाहीयेत, हे आता स्पष्टच झालं आहे. मात्र दिशा यांना अटक योग्य नाही आणि घटनात्मक मूल्यांची पायमल्ली करणारी आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही दिशाच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, हा धमकविण्याचाच प्रकार आहे. मी दिशा रवी यांच्या सोबत आहे.
टूलकिट म्हणजे नेमकं काय?
सध्याच्या काळात जगभरात जितकी आंदोलनं होतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन केलं जातं.
यामध्ये 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर्स' असो की अमेरिकेतील 'अँटी-लॉकडाऊन प्रोटेस्ट' किंवा पर्यावरणाशी संबंधित 'क्लायमेट स्ट्राईक कँपेन' अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाचं नियोजनाचं काम केलं जातं.
याठिकाणी आंदोलन पुढे नेण्यासाठी त्याच्याशी संबंधित लोक विशिष्ट प्रकारचं नियोजन करत असतात. यासाठीचे मुद्दे लिहून संबंधित लोकांना पाठवले जातात. यालाच 'टूलकिट' असं संबोधलं जातं.
टूलकिट शब्दाचा वापर सोशल मीडियाच्या संदर्भात जास्त प्रमाणात होतो. यामध्ये सोशल मीडियावरील रणनितीसह प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती दिलेली असते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याचा प्रभाव वाढवण्याची क्षमता असलेल्या लोकांना हे टूलकिट शेअर केलं जातं. त्यामुळे टूलकिट हे कोणत्याही आंदोलनाच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे, असं आपल्याला म्हणता येईल.
भिंतींवर लावायच्या पोस्टर्सचं आधुनिक स्वरुप म्हणून टूलकिटची व्याख्या करता येईल.
वर्षानुवर्षे आंदोलन करत असलेले लोक इतरांना आवाहन करण्यासाठी याचा वापर करू शकतात.
सोशल मीडिया आणि मार्केटिंग तज्ज्ञांनुसार, या टूलकिटचा मुख्य उद्देश लोकांमध्ये (आंदोलनाचे समर्थक) समन्वय साधणं हा असतो.
लोक काय लिहू शकतात, कोणते मुद्दे वापरू शकतात, कोणता हॅशटॅग वापरावा, कोणत्या वेळी ट्वीट केल्यास जास्त उपयोगी ठरेल, या सर्व गोष्टी या टूलकिटमध्ये दिल्या जातात.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)