शरद पवार म्हणतात, नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद चर्चेसाठी खुलं

फोटो स्रोत, FACEBOOK
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
याविषयी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, "विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचं होतं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हॅकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल."
पदाचा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी त्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीला कल्पना दिली होती. पक्षात त्यांना नवी जबाबदारी मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. ती काँग्रेसची अंतर्गत बाब आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
पवारांच्या या वक्त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा सांगणार का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.
याविषयी माध्यमांना बोलताना पवार यांनी म्हटलं की, "विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला द्यायचं आमच्यात ठरलं होतं. पण. हे नव्हतं ठरलं की काँग्रेसचे नेते हे पद वर्षभरानंतर सोडतील. त्यामुळे हे पद आता चर्चेसाठी खुलं झालं आहे."
राजीनाम्यानंतर पटोले काय म्हणाले?
नाना पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "पक्षश्रेष्ठींनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि तो मी आनंदानं दिला आहे. आता जी काही जबाबदारी मला मिळेल तिला चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास नेणं हे माझं काम आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








