IPL Auction: आयपीएल लिलावापूर्वी कसे आहेत संघ? कोणाकडे किती आहेत पैसे?

फोटो स्रोत, NurPhoto
इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या हंगामासाठी आठही संघ सज्ज झाले आहेत.
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनकडे नेतृत्व देण्याची खेळी केली आहे. स्टीव्हन स्मिथला त्यांनी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने रॉबिन उथप्पाला चेन्नईला ट्रेड ऑफ केलं आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं जेतेपद पटकावलं होतं. मुंबई इंडियन्सच्या नावावर 5 जेतेपदं आहेत. मात्र तरीही मुंबई इंडियन्सने लसिथ मलिंगा, जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन कोल्टिअर नील या फास्ट बॉलिंग त्रिकुटाला वगळलं आहे.
पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला बाजूला केलं आहे. दिल्लीने डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना बेंगळुरूला ट्रेडऑफ केलं आहे.
चेन्नईने हरभजन सिंहचा करार वाढवलेला नाही. त्यांनी पीयुष चावलाला डच्चू दिला आहे तर केदार जाधवलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH
बेंगळुरूने आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, मोईन अली, उमेश यादव, इसरु उदाना, पवन नेगी यांना डच्चू दिला आहे.
प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार, कोणाला वगळणार, कोणाला लिलावात खुलं करणार हे बुधवार संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणं अपेक्षित होतं.
वैयक्तिक कारणास्तव सुरेश रैनाने दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र रैनाच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला बसला. चेन्नई बादफेरीत पोहोचू शकलं नाही. मात्र चेन्नईने रैनावर विश्वास ठेवला आहे.
अनुभवी स्पिनर हरभजन सिंग आता चेन्नईसाठी खेळताना दिसणार नाही. हरभजनने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. "चेन्नई सुपर किंग्ससंघाबरोबरचा माझा करार संपला आहे. या संघाकडून खेळणं हा सुरेख अनुभव होता. अनेक छान आठवणी माझ्याकडे आहेत. मला अनेक मित्र मिळाले. चेन्नई संघाबरोबरचा प्रवास मला नेहमीच स्मरणात राहील. चेन्नई संघव्यवस्थापन, कर्मचारी, चाहते यांचे मनापासून आभार मानतो", असं हरभजनने म्हटलं आहे.
सनरायझर्स हैदराबाद
संघात कायम-डेव्हिड वॉर्नर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, मोहम्मद नबी, मिचेल मार्श, केन विल्यमसन, वृद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, जेसन होल्डर, शाहबाझ नदीम, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, विजय शंकर, विराट सिंग, बसिल थंपी, रशीद खान, टी.नटराजन, खलील अहमद.

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर- आर.संजय यादव, संदीप बावनका, बिली स्टॅनलेक, फॅबिअन अलन, वाय.पृथ्वी राज
लिलावासाठी उपलब्ध रक्कम-10.75 कोटी
आवश्यकता- हैदराबादने अगदी किरकोळ बदल केले आहेत. चांगला राखीव अष्टपैलू किंवा विदेशी बॉलर ते घेऊ शकतात.
किंग्ज इलेव्हन पंजाब
संघात कायम- के.एल. राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, दर्शन नालकांडे, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार.

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर-ग्लेन मॅक्सवेल, शेल्डॉन कॉट्रेल, कृष्णप्पा गौतम, मुजीब उर रहमान, जेम्स नीशाम, हार्डुस व्हिलजोन, करुण नायर, जगदीश सुचिथ, ताजिंदर सिंग
लिलावासाठी उपलब्ध रक्कम-53.20 कोटी
आवश्यकता- पंजाबला बॉलिंग विभाग बळकट करायचा आहे. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये रन्स रोखू शकेल आणि विकेट्स पटकावेल अशा बॉलर्सची आवश्यकता. त्यांना स्पिनर्सची गरज आहे कारण त्यांनी तीन स्पिनर्सना सोडून दिलं आहे.
मुंबई इंडियन्स
संघात कायम - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर-जेम्स पॅटिन्सन, लसिथ मलिंगा, नॅथन कोल्टिअर नील, मिचेल मक्लेघान, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख, शेरफन रुदरफोर्ड.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 15.35कोटी
आवश्यकता- मुंबईला विदेशी फास्ट बॉलर आणि लेगस्पिनरची आवश्यकता आहे. मुंबईनेही मोठे बदल केलेले नाहीत.
कोलकाता नाईट रायडर्स
संघात कायम-आयोन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरिन, राहुल त्रिपाठी , पॅट कमिन्स, , वरुण चक्रवर्ती, टीम सैफर्ट

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर- हॅरी गुर्ने, टॉम बँटन, सिद्धेश लाड, निखिल नाईक, एम.सिद्धार्थ, अली खान, ख्रिस ग्रीन.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 10.75कोटी
आवश्यकता- कोलकाताचा संघ युवा भारतीय खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करू शकतो. चार विदेशी खेळाडूही हवे आहेत.
दिल्ली कॅपिटल्स
संघात कायम- श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, मार्कस स्टॉइनस, प्रवीण दुबे, शिमोरन हेटमायर, अँनरिक नॉर्किया, ललित यादव

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर-मोहित शर्मा, कीमो पॉल, संदीप लमाचीने, अॅलेक्स कॅरे, जेसन रॉय, तुषार देशपांडे.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम- 12.90कोटी
आवश्यकता- राखीव भारतीय विकेटकीपर. 2020 हंगामात ऋषभ पंतकरता राखीव भारतीय विकेटकीपर नसल्याने दिल्लीला नाईलाजाने संघात दोन बदल करावे लागले होते. विदेशी खेळाडू पाचच असल्याने त्यांचा भरणा होऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्स
संघात कायम- महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, , लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, , शार्दूल ठाकूर, सॅम करन, जोश हेझलवूड

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर- केदार जाधव, मुरली विजय, शेन वॉटसन, पीयुष चावला, हरभजन सिंग, मोनू सिंग.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम-22.90 कोटी
आवश्यकता- ऑफस्पिनर तसंच मधल्या फळीतील बॅट्समन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
संघात कायम एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अॅडम झंपा, केन रिचर्डसन, शाहबाझ अहमद, जोश फिलीप, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स.

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर- मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंग मान, आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, पवन नेगी, पार्थिव पटेल, इसरु उदाना, उमेश यादव.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम-35.90कोटी
आवश्यकता- बेंगळुरूला चांगल्या विदेशी फास्ट बॉलर्सची तसंच अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे. कोहली आणि डीव्हिलियर्सवरचा भार हलका करू शकेल अशा अनुभवी खेळाडूची गरज आहे.
राजस्थान रॉयल्स
संघात कायम- संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत,अँड्यू टाय.

फोटो स्रोत, BCCI/IPL
बाहेर-स्टीव्हन स्मिथ, टॉम करन, वरुण आरोन, ओशाने थॉमस, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी, अंकित राजपूत, शशांक सिंग.
लिलावासाठी उपलब्ध रक्कम-34.85 कोटी
आवश्यकता- बेन स्टोक्ससाठी पर्यायी अष्टपैलू खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. जोफ्रा आर्चरला तोलामोलाची साथ देईल असा बॉलरही राजस्थानला हवा आहे. अनुभवी भारतीय बॅट्समन ताफ्यात समाविष्ट झाल्यास राजस्थानसाठी फायदेशीर ठरू शकतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








