You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या?- अनिल देशमुख
"सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्यात आला. याला 4-5 महिने झाले आहेत. महाराष्ट्र आणि राज्याबाहेर लोक उत्सुकतेने सीबीआय रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत". असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ते म्हणाले, "सुशांत सिंह ने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? याबाबतीत सीबीआयने त्यांचा चौकशी अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे. "
गृहमंत्री म्हणून मला अनेक लोक प्रश्न विचारतात. सुशांतच्या प्रकरणाचं काय झालं? ही हत्या आहे की आत्महत्या? त्याचा खुलासा सीबीआयने लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करतो, असंही त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत काय काय घडलंय?
14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्र्यातील आपल्या रहात्या घरी आत्महत्या केली.
27 जुलैला राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.
पार्थ पवार यांच्या मागणीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातव्याच्या बोलण्याचा किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, अशी टिका केली.
30 जुलै - भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून सीबीआय चौकशीची मागणी केली.
31 जुलै- भाजपचे आमदार अतुल भातळखकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकास आघाडीतील एका तरुण मंत्र्याच्या या प्रकरणात सहभाग असल्याचा त्यांनी आरोप केला.
4 ऑगस्ट- उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि राज्याचे वाहतूक मंत्री अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचं विधान केलं. सुशांत प्रकरणी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं परब यांनी म्हंटलं होतं.
9 ऑगस्ट- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये या प्रकरणाचा स्क्रिन-प्ले आधीच लिहिण्यात आला होता, असं वाटतंय असं विधान केलं होतं.
18 ऑगस्ट- महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनीही सीबीआय चौकशी करण्यास हरकत नाही, असं वक्तव्य केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)