शेतकरी आंदोलन: शीख संत राम सिंग यांची सिंघू बॉर्डरवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

शीख संत राम सिंग यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू बॉर्डरवर निधन झाले.

त्यांनी कथितरीत्या स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

राम सिंग यांचे सहकारी जोगा सिंग यांनी सांगितले की शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहवत नाही असे संत राम सिंग म्हणाले. ते दुसऱ्यांदा सिंघू बॉर्डरवर आले होते.

65 वर्षीय राम सिंग हे हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी पंजाबीला सांगितले की त्यांच्या निधनाची बातमी त्यांना माध्यमांकडूनच कळली.

"आमच्याकडे याबाबत अद्याप याबाबत काही अधिकृत माहिती नाही. त्यांनी आत्महत्या केल्याचं माध्यमांकडूनच कळले आहे," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

घटनास्थळावरून राम सिंह यांना कर्नाल रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलीस इतर जबाब नोंदवत आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संत राम सिंग नानकसार यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की "संत राम सिंग नानकसार, सिंगडावाले यांनी सिंघू बॉर्डरवर कृषी कायद्याचा विरोध करत आपला जीव गमावल्याचे ऐकून अतोनात दुःख झाले. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि भक्त परिवाराच्या दुःखात सहभागी आहे."

दिल्ली सोनिपत पोलिसांनी त्यांच्या मृत्यूबाबत दुजोरा दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)