कोरोना व्हायरस : काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- बीबीसी फॅक्ट चेक

कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी हिंदी

कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दलही अनेक मेसेज सोशल मीडियावर येत आहेत.

गेल्या वर्षीही कोरोनाची पहिली लाट तीव्र असताना कोरोनाच्या औषधाबद्दल सोशल मीडियावर अनेक दावे गेले. अशाच अनेक दाव्यांपैकी एका दाव्याची सत्यता बीबीसीने पडताळून पाहिली होती.

लाईन

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअवरवर कोरोनावर घरगुती उपचार करण्यासाठी औषध मिळालं आहे असेही मेसेजेस येत आहेत.

बीबीसीला याबाबत वाचकांनी या एका मेसेजची सत्यता पडताळण्याची विनंती केली. अनेक वाचकांनी हा मेसेज पाठवला आहे.

काय आहे मेसेज?

'एक चांगली बातमी. अन्ततोगत्वा पाँडेचेरी विद्यापिठाच्या रामू या भारतीय विद्यार्थ्याने कोव्हिड-19 वरचे उपचार शोधून काढले आहेत. त्याला WHO ने मान्यता दिली आहे. एक चमचा काळी मिरीपूड, दोन चमचे मध, थोडासा आल्याचा रस सलग 5 दिवस घेतल्यास कोरोनाच्या संसर्गातून 100 टक्के मुक्तता मिळते. सगळं जग हे करत आहे. 2020च्या शेवटच्या टप्प्यात सुखद अनुभव. तुमच्या ग्रुप्समध्ये जरुर पाठवा. धन्यवाद'

कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, WHATSAPP VIRAL

WHO काय म्हणतं?

बीबीसी हिंदीच्या फॅक्ट चेक टीमने पॉंडेचेरी विद्यापिठाचे प्रवक्ते के. मकेश यांच्याशी संपर्क केला. तेव्हा असं कोणतंही औषध त्यांच्या विद्यार्थ्याने बनवलं नसल्याचं आणि हे औषध बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.

WHO च्या वेबसाईटवर गेल्यास अशा भ्रामक बातम्यांसाठी त्यांनी वेगळा सेक्शनच तयार केला आहे. त्यामध्ये खाणं-पिणं, औषधांसदर्भात खोट्या दाव्यांची माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, TWITTER

औषधासंबंधी वेबसाईटवर लिहिलं आहे, "आता अनेक औषधांची चाचणी सुरू आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन किंवा कोणतंही औषध कोव्हिड-19 वर लागू पडेल याला कोणताही पुरावा सापडलेला नाही. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या चुकीच्या उपयोगामुळे दुष्परिणाम आणि दुसरे आजार होऊ शकतात. मृत्यूही ओढावू शकतो. कोव्हिड-19 वर उपचारासाठी WHO औषधं तयार करण्याचे प्रयत्न आणि त्याच्या मुल्यांकनात मदत करत आहे."

जागतिक आरोग्य संघटना

याबरोबरच WHO ने कोरोना व्हायरस अजून कोणतंही औषध तयार झालेलं नाही हे स्पष्ट केलं आहे. तसंच मिरी खाल्ल्यामुळे कोरोनापासून रक्षण होतं याबद्दल काहीही स्पष्ट नसल्याचं सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, WHO

WHO म्हणते, काळी मिरी तुमचं जेवण अधिक स्वादिष्ट बनवू शकते परंतु कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत नाही. कोरोना व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी एक मीटर अंतर ठेवणं, सतत हात धुणं, संतुलित आहार घेणं, पाणी योग्य प्रमाणात पिणं, व्यायाम करणं, योग्य प्रमाणात झोप घेणं आवश्यक आहे.

काही परंपरागत उपायांनी लक्षणांमधून थोडा आराम मिळेल पण ते या आजारावरचं औषध नाही हे संघटनेने मान्य केलं आहे.

कोव्हिड-19 च्या संसर्गाबाबतीत शरीराची रोगप्रतिकारक क्षमतेची भूमिका महत्त्वाची मानली जाते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही सूचना केल्या होत्या.

कोरोना
लाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम आणि काढा पिण्याचा सल्ला दिला होता. आयुष मंत्रालयानेही रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काढा, हळदीचे दूध, व्यायाम असे उपाय सूचवले होतो.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, वास न येणं यांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरसः काळ्या मिरीने कोव्हिड-19 बरा होतो?- फॅक्ट चेक

फोटो स्रोत, AYUSH MINISTRY

खोकला आणि सर्दीच्या लक्षणांत काळी मिरी, मध, आलं यांच्यामुळे थोडा आराम मिळतो परंतु ते करोनावरचं औषध आहे हे मात्र बीबीसीच्या फॅक्ट चेकमध्ये दिसलेलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)