विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्याकडे गुड न्यूज

फोटो स्रोत, Twitter
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे.
अनुष्का ही गर्भवती असून तिला बाळंतपणासाठी जानेवारी 2021 मधील तारीख देण्यात आल्याची माहिती विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता.
विवाहानंतर अडीच वर्षांनंतर दोघांच्या संसाराला एक नवा अंकुर फुटणार आहे.
चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या विराट आणि अनुष्का 2014 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या जोडीला चाहते विरुष्का असं संबोधतात.

फोटो स्रोत, Twitter
विरुष्काने 2017 च्या डिसेंबर महिन्यात विवाह करण्याचा निर्णय घेतला.
इटलीच्या टस्कनी शहरातील एका खासगी रेसॉर्टमध्ये त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला फक्त घरातील मोजकीच मंडळी उपस्थित होती.
त्यानंतर विरुष्का यांनी 21 डिसेंबर 2017 रोजी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा उपस्थित होते.
नुकतंच सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी आपल्या दुसऱ्या बाळंतपणाबाबत माहिती दिली होती.
त्यानंतर काही दिवसांतच विराट आणि अनुष्या यांनी एक गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
विराट आणि अनुष्का यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असल्याचं चित्र आहे.
विराटने 11 वाजता गुडन्यूज संदर्भातलं ट्वीट केलं होतं. तासाभरातच दोन लाखांच्या वर लोकांनी हे ट्वीट लाईक केलं. तर 20 हजारांहून अधिक लोकांनी विराटचं ट्वीट रिट्वीट केला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








