IPL 2020 वेळापत्रक : फायनल 10 नोव्हेंबरला; प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

IPL

फोटो स्रोत, Getty Images

यंदाच्या आयपीएल हंगामाची फायनल 10 नोव्हेंबरला होणार असून, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

लीग स्टेजनंतर चार संघ गाशा गुंडाळतील तर चार संघ प्लेयऑफसाठी पात्र ठरतील.

5 नोव्हेंबरला क्वालिफायर 1चा सामना होईल. लीग मॅचेसनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानी असणारा संघ आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ यांच्यात हा मुकाबला होईल. दुबई इथे हा सामना होईल.

6 नोव्हेंबरला एलिमिनेटरचा सामना होईल. लीग मॅचेसनंतर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या संघात हा मुकाबला होईल. पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. अबू धाबी इथे हा सामना होईल.

8 नोव्हेंबरला क्वालिफायर 2 सामना होईल. एलिमिनिटेर लढतीतील विजेता आणि क्वालिफायर1 मधील पराभूत संघ यांच्यात हा सामना होईल. अबू धाबी इथे हा सामना होईल.

10 नोव्हेंबरला क्वालिफायर 1चा विजेता संघ आणि क्वालिफायर2चा विजेता संघ यांच्यात फायनल रंगेल. दुबई इथे हा सामना रंगेल.

सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेसात वाजल्यापासून सुरू होतील.

कोरोनामुळे IPL लांबणीवर गेलं होतं

IPL 2020 यंदा 29 मार्च ते 17 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळाकरता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने भारतात ही स्पर्धा खेळवणं अवघड होतंच. त्यातल्या त्यात IPL स्पर्धेत परदेशी खेळाडू तसंच त्यांचा सपोर्ट स्टाफ, अशी परदेशातील माणसं मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. त्यामुळे जोखिम तेवढीच होती.

कोरोनामुळे IPLचं आयोजन होऊ शकलं नाही तर BCCIला 4000 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी BCCI सह कंपन्यांच्या मालक फ्रँचाइजी उत्सुक आहेत.

आयोजनासाठी आधी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांची नावं आयोजनासाठी चर्चेत होती. श्रीलंकेतही आयोजन होऊ शकतं, अशी चर्चा होती.

परंतु टाईम झोनमुळे UAEला प्राधान्य देण्यात आलं.

कोरोना
लाईन

अखेर 19 सप्टेंबरला IPL 2020 UAEमध्ये सुरू होणार असून 10 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा चालेल, असा निर्णय IPLच्या एका बैठकीत 2 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.

देशात चीनविरोधात संताप आणि चिनी वस्तूंच्या बहिष्काराची भावना असतानाच, BCCIने मात्र IPLच्या टायटल स्पॉन्सरचा मान VIVO कडे कायम ठेवला आहे. त्यामुळे यंदाची IPL ही VIVO IPL असणार आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शारजा, दुबई आणि अबुधाबी या तीन स्टेडियममध्ये मॅचेस खेळवण्यात येतील. सर्व मॅचेस प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील.

या 53 दिवसांमध्ये 10 सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता तर उर्वरित सर्व सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील, अशी माहिती BCCIच्या वतीने देण्यात आली.

प्लेऑफ्स म्हणजे उपांत्य सामन्यांपूर्वीच्या काळात महिला T20 चॅलेंज सामनेही खेळवले जातील, ज्यात तीन संघ एकूण चार सामने खेळतील, असंही BCCIने जाहीर केलं.

यासंदर्भातल्या खेळाचे नियम, खेळाडूंसाठीची मार्गदर्शक तत्त्वं आणि सूचना लवकरच जारी केल्या जातील, त्यासाठी आपण सर्व संघांच्या मालकांबरोबर लवकरच बैठक बोलावणार असल्याचं BCCIचे मानद सचिव जय शाह यांनी एका परिपत्रकात म्हटलं.

2014 मध्ये सार्वत्रित निवडणुकांमुळे स्पर्धेचा पहिला टप्पा UAEमध्येच खेळवण्यात आला होता. 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे अख्खी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्याने आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग सुकर झाला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सगळे नियम पाळून मॅचेस खेळवण्यात येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)