मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवली 15 जुलै रोजी

फोटो स्रोत, Getty Images
मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी 15 जुलै रोजी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मराठा आरक्षण तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशावर याच दिवशी सुनावणी होईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
आज झालेली सुनावणी व्हीडिओ काँफरन्सिंगद्वारे घेण्यात आली. न्यायालय नियमितपणे सुरू झाल्यावर यावर सुनावणी होईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
मुंबई हायकोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण कायम ठेवलं होतं. यानिर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर होणाऱ्या सुनावणी मध्ये खासदार संभाजी राजे छत्रपती हे कोल्हापूर मधून सहभागी झाले होते. आहेत. निमंत्रित म्हणून ते सहभागी झाले होते.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या गायकवाड कमिशननुसार मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण मिळू शकतं असं म्हटलं होतं.
मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण मिळण्याबाबतचं विधेयक महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं होतं. राज्य मागासवर्गाच्या आयोगाने अहवाल सादर केला होता.
कोरोना व्हायरस आकडेवारी
त्यात मराठा हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे मागासलेले आहेत त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली. त्यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकारनं विधीमंडळात आरक्षणाचा कायदा मंजूर केला. या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हे आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून मंजूर होणं आवश्यक आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








