सरोज खान यांचा अंदाज जेव्हा माधुरी दीक्षितनं चुकीचा ठरवला...

सरोज खान माधुरी दिक्षित

फोटो स्रोत, facebook

ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन झालं. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलंय. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या 'एक..दो..तीन...' या 'तेजाब' सिनेमातील गाण्याचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं.

बीबीसीच्या एशियन नेटवर्कशी याबाबत एकदा अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनं संवाद साधला होता. त्यावेळी तिने सरोज खान यांच्याबद्दल आणि विशेषत: 'एक..दो..तीन'बद्दल अनेक आठवण सांगितल्या होत्या.

"तेजाब सिनेमातील 'एक..दो..तीन..'नंतर कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत मी 'उत्तर दक्षिण', 'राम लखन' अशा सिनेमांमध्येही काम केलं होतं. मी भारतीय पारंपरिक नृत्य चांगलं करते, हे सरोज खान यांना माहित होतं. मात्र, त्या म्हणायच्या की, ही मुलगी पाश्चिमात्य नृत्य (Western Dance) नीट करू शकत नाही."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सरोज खान यांचं हे मत माधुरी दीक्षितनं 'एक..दो..तीन' या गाण्यातून खोटं ठरवलं होतं. या गाण्यात माधुरीनं वेस्टर्न स्टाईल डान्स केला. त्याबद्दल माधुरीनं बीबीसीच्या याच कार्यक्रमात सविस्तर सांगितलं होतं.

माधुरीनं सांगितलं, "गाण्याच्या चित्रिकरणाआधी आम्ही अनेकवेळा सराव केला. हा तोच काळ होता, ज्यावेळी मी बॉलीवूड डान्सिंग स्टाईल शिकले. तेजाब सिनेमातील 'एक..दो..तीन' या गाण्यात मी चांगलं नृत्य करू शकले, असं मला वाटतं खरं, पण ते सरोज खान यांच्याशिवाय कदापि शक्य नव्हतं."

तेजाब सिनेमाबद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा माधुरी दीक्षितनं या कार्यक्रमात केला. माधुरी सांगत होती, "ज्यावेळी तेजाब सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा मी भारतात नव्हते. बहिणीच्या लग्नासाठी अमेरिकेत गेले होते. मला अजिबात वाटलं नव्हतं की, 'एक..दो..तीन' हे गाणं इतकं सुपरहिट होईळ. माझा सेक्रेटी राकेश नाथने मला फोन करून सांगितलं की, सिनेमा हिट झालाय. मला विश्वासच बसला नाही. तेबाज माझा पहिला हिट सिनेमा होता."

"अमेरिकेतून परतले तेव्हा, 'तेजाब' प्रदर्शित होऊन दीड आठवडे उलटले होते. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर कारमध्ये बसले, तर दोन मुलं माझ्याकडे पाहून, एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मला वाटलं, त्यांनी ओळखलं असावं. त्यातला एकजण पुढे आला आणि म्हणाला, तुम्ही 'एक..दो..तीन'मध्ये डान्स केलेल्याच आहात ना? आम्हाला ऑटोग्राफ द्याल? मी ऑटोग्राफ दिल्यानंतर ते म्हणाले.. मोहिनी.. मोहिनी…"

सरोज खान माधुरी दिक्षित

फोटो स्रोत, Getty Images

लोकप्रियता आणि यश काय असतं, हे विमानतळाबाहेर त्या मुलांना ऑटोग्राफ दिल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं असं माधुरी सांगते.

अर्थात, माधुरी दीक्षितला कुठलीच सिनेजगताची पार्श्वभूमी नसते. त्यामुळे ती या यशाचं विश्लेषणही त्या अंगानं करते. बीबीसीच्या याच मुलाखतीत माधुरीनं यशाबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं.

"तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक असायला हवं. तुम्ही तुमच्या कामाबाबद्दल खरे असाल, तर यश तुमच्यापासून दूर जाऊच शकत नाही. कुठल्याही दृश्याचं चित्रिकरण करताना मी हाच विचार करते की, हे दृश्य सर्वात चांगलं कसं करता येईल."

माधुरी दीक्षितच्या गाण्यांवर आजही अनेकजण ठेका धरतात. पण माधुरीला कोणत्या गाण्यावर नृत्य करायला आवडेल, असं बीबीसीनं विचारलं होतं. त्यावेळी माधुरीनं 'पाकिजा' सिनेमातील गाण्यांची नावं घेतली होती.

"पाकिजा असा सिनेमा होता, ज्यात त्यातील गाणी सिनेमाच्या कथानकाची अविभाज्य भाग होती. या सिनेमातली सर्वच गाणी माझ्या आवडीची आहे. जेव्हा कधी संधी मिळते, मी या गाण्यावर नाचतेच."

सरोज खान यांच्या जाण्यानं अनेकांनी सोशल मीडियावरही माधुरीसोबतचे सरोज खान यांचे फोटो शेअर केले आहेत. यातील बहुतांश फोटो 'एक..दो.. तीन..' या तेजाबमधील सिनेमातीलच गाण्याचेच आहेत.

नृत्यामध्ये पारंगत असेली माधुरी आणि नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं अनोखं रसायन आजवर हिंदी सिनेसृष्टीनं अनुभवलं आहे. सरोज खान यांच्या जाण्यानं तो एक धागा तुटला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)