कोरोना अनलॉक : राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधनं लादू नका- केंद्राची स्पष्ट सूचना

फोटो स्रोत, Getty Images
देशात सध्या अनलॉक- 3 च्या टप्प्यामध्ये अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रवासी आणि माल वाहतुकीवर निर्बंध आहेत. महाराष्ट्रामध्येही अजून एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यात जायला ई-पास गरजेचा आहे. पण राज्यांनी प्रवासी आणि मालाची वाहतूक कोणत्याही निर्बंधांशिवाय होऊ द्यावी असं गृहखात्याने म्हटलंय.
राज्यांतर्गत किंवा दोन राज्यांमधल्या प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध केंद्राने उठवले असताना अशा प्रकारची बंदी जिल्हा वा राज्य प्रशासनाने घालणं हे गृहखात्याच्या सूचनांचं उल्लंघन असल्याचं गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलंय.
गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं आहे.

फोटो स्रोत, PIB
विविध जिल्हे वा राज्यांनी निर्बंध लावले असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून या निर्बंधांमुळे दोन राज्यांमधल्या वस्तूंच्या पुरवठा साखळीमध्ये अडथळे येत असल्याचं या पत्रात म्हटलंय.
राज्यांतर्गत वा दोन राज्यांमधल्या व्यक्ती, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात येऊ नयेत असं या पत्रात म्हटलंय.
देशात आणि महाराष्ट्रात सध्या अनलॉक -3 चा टप्पा सुरू आहे. देशभरातल्या कंटन्मेंट झोन्समध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. याच अनलॉकच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचं पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारने 19 ऑगस्टला राज्यातली एस.टी. सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
यासाठी कोणत्याही पास वा परवानगीची गरज नसेल. एसटी महामंडळातर्फे स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर करण्यात येईल. त्यानुसारच पूर्ण प्रवास होणार आहे.
या अनलॉक - 3 मध्ये रात्रीच्या संचारबंदीत माणसांच्या येण्या-जाण्यावरचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण शाळा, महाविद्यालयं 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोरोना व्हायरसमुळे देशात यावर्षीच्या मार्च महिन्यात देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात मॉल सुरू, फूड कोर्टवर बंदी
महाराष्ट्रात हा लॉकडाऊन - 7 म्हणजेच अनलॉक - 3 आहे. याला 'मिशन बिगीन अगेन' असंही शासनाच्या आदेशात म्हटलं आहे. गेल्या लॉकडाऊनसंदर्भातील काही नियम आणि अटी या लॉकडाऊनमध्येही कायम राहणार आहेत.
राज्य सरकारने लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही नियम शिथील करण्यात आले आहेत. राज्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडायला परवानगी देण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मॉल सुरू ठेवता येतील. मात्र, मॉल्समधील चित्रपटगृहं आणि फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरू करता येणार नाही. फक्त सगळ्या नियमांचं पालन करून फुड डिलिव्हरी या रेस्टॉरंट्समधून करता येईल.
मद्यविक्रीवर बंदी कायम असून मद्यविक्रीच्या केवळ होम डिलिव्हरी करण्याला परवानगी आहे.
या नियमांमधून सलून सुरू करण्याला पूर्वीच सूट मिळाली होती. मात्र, सलून सुरू करण्याला सशर्त परवानगी देण्यात आल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलंय.
या टप्प्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असं राज्य शासनाने स्पष्ट केलंय.
कंटेनमेंट झोनमध्ये बंदीच
कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक नियम लागू असतील. कंटेनमेंट झोन कोणते आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर माहिती देतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कंटेनमेंट झोनमधील हालचालींवर प्रशासनाचं बारीक लक्ष असेल.
मुंबई, पुण्यासाठी कठोर नियम
मुंबईसह राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या क्षेत्रात कोरोनावाढीचा दर चढा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह महानगर प्रदेश क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना कार्यालयात जाण्यासाठी दूरचा प्रवास करता येणार आहे. इतरांना जवळच्या बाजारात जाता येईल. पण, त्यापेक्षा फार दूर जाता येणार नाही.
पुणे, ठाणे या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या भागात स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग करण्याचे नियम कठोरपणे राबवले जाणार आहेत. तसंच, या शहरांमधल्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे सर्व निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

फोटो स्रोत, Getty Images
पावसाळा सुरू असल्याने पावसाळ्यातली महत्त्वाची कामं करण्याला परवानगी आहे. कमी महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासावर अजूनही बंदीच आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

मुख्य बंधनं
- वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसंच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी)
- लग्नांमध्ये 50 च्यावर माणसांना परवानगी नाही. तसंच, अंत्ययात्रांमध्येही 50 च्यावर माणसांना सहभागी होता येणार नाही.
- जिल्हांतर्गत बस सेवेला परवानगी. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीच प्रवास करू शकतात. आंतरजिल्हा बससेवेला परवानगी नाही. यासंदर्भात स्वतंत्र सूचना निर्देशित करण्यात येतील.
- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच 6 फूटांचं अंतर पाळणं आवश्यक आणि चेहऱ्यावर मास्क लावणं बंधनकारक.
- बस, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. केंद्राने परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.
लॉकडाऊनच्या या टप्प्यात कोणत्या गोष्टींवर बंधनं असतील आणि कोणत्या गोष्टींसाठी सवलती मिळतील?
- सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
- कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
- प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी.
- गॅरेज तसंच वर्कशॉप यांना अपॉइंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी.
- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग उपस्थित असेल.

फोटो स्रोत, ANI
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा
- सर्व मार्केट, दुकानं यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट संकुलं यांना समविषम पद्धतीने उघडण्यास परवानगी.
- कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अंमलात असणार नाही.
- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
- लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी. मोटाराईज्ड गाड्यांद्वारे शॉपिंग करण्याला अनुमती नाही.
- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
- वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसंच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )
- जिल्हांतर्गत बस सेवेला परवानगी. बस क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीच प्रवास करू शकतात. आंतरजिल्हा बससेवेला परवानगी नाही. यासंदर्भात स्वतंत्र सूचना निर्देशित करण्यात येतील.

फोटो स्रोत, Getty Images
'वर्क फ्रॉम होम' करा
- खाजगी ऑफिसेसमध्ये 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणं अनिवार्य.
- खेळांची मैदानं, क्रीडा संकुलं खुली करण्याची परवानगी. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रेक्षकांना येण्याची अनुमती नाही.
- सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकारक.
- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच 6 फूटांचं अंतर पाळणं आवश्यक.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा असेल.
- सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध.
- ज्यांना शक्य आहे त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करावं. कार्यालयं, कामाच्या ठिकाणी, शॉप, मार्केट, औद्योगिक केंद् याठिकाणी गर्दी किंवा एकत्र येण्यास मनाई.
- कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणाऱ्या ठिकाणी नियमित स्वच्छता.
- कामावर असणाऱ्या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक.

फोटो स्रोत, ANI
कोणत्या गोष्टी बंद राहतील?
- शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
- आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक
- मेट्रो रेल्वे
- ट्रेन्सची नियमित वाहतूक
- सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.
- कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
- विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळं
- शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
- सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








