उद्धव ठाकरेंवरचं संकट टळलं, 21 मे रोजी होणार परिषदेची निवडणूक

फोटो स्रोत, CMO
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरची टांगती तलवार दूर होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधान परिषदेची निवडणूक 21 मे 2020 रोजी घेण्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी उद्धव यांना 27 मेपर्यंत आमदार होणं आवश्यक आहे.
ही निवडणूक 24 एप्रिलला होणार होती. मात्र कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्या परिषदेत नियुक्ती करण्यात यावी. पण राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली नाही.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींशी फोनवरून बोलले. त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की परिषदेची स्थगित केलेली निवडणूक आता घेण्यात यावी.
त्यानंतर 1 मे रोजी सकाळी निवडणूक आयोगाची बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली त्यानंतर 21 मे रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. काल मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही कोव्हिड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती दिली आणि सुरक्षित वातावरणात निवडणूक कशा पद्धतीने घेतल्या जातील, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन निवडणूक पार पाडण्यासाठी एका अधिकाऱ्याची निवड करावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

निवडणुकीचं वेळापत्रक
येत्या 4 मेला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 मे आहे, तर अर्ज मागे घेण्याची तारीख 14 मे आहे. 21 मे रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल लागेल. 26 मे पर्यंत ही संपूर्ण प्रकिया पार पाडायची आहे असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








