कोरोना व्हायरस : मुंबईतील CAAविरोधी आंदोलन प्रतीकात्मक, शाहीन बागमध्ये पेट्रोल बॉम्बने हल्ला

व

सीएएच्या विरोधात मुंबईतल्या भायखळामध्ये सुरू असलेली निदर्शनं आता प्रतिकात्मक करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनांच्या ठिकाणच्या महिला घरी जात आहेत, पण त्याचं निदर्शन स्थळ आहे तसंच ठेवण्यात येणार असल्याचं आश्वासन मुंबई पोलिसांनी त्यांना दिल्याचं एका आंदोलक महिलेनं सांगितलं आहे.

आंदोलक महिलांनी त्यांच्या खुर्च्या आणि फलक आंदोलनस्थळीच ठेवले आहेत.

शाहीन बागमध्ये पेट्रोल बॉम्बने हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. यादरम्यान दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये पेट्रोल बॉम्बचा हल्ला झाला आहे.

शाहीन बाग

फोटो स्रोत, ANI

शाहीन बागमध्ये मोडतोड करण्यात आली आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, अशा बातम्या समोर येऊ लागल्या. शाहीन बागमध्ये 15 डिसेंबर 2019पासून काही महिला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शन करत आहेत.

याविषयी बीबीसीनं पोलिसांना विचारलं असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला असला तरी हा हल्लाच होता, असं स्पष्ट केलं नाही.

सध्या या गोष्टीची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर अधिकृत निवेदन दिलं जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

कोरोना व्हायरसमुळे निदर्शन थांबवा असं शाहीन बागमधील महिलांना सांगण्यात आलं होतं, पण निदर्शन सुरूच राहिल, असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे.

असं असलं तरी, कोरोनाच्या संसर्गाची बाब लक्षात घेऊन निदर्शन करणाऱ्या महिलांची संख्या कमी असेल, असं आयोजकांनी सांगितलं होतं.

शाहिन बाग

फोटो स्रोत, EMAD KAZI

जनता कर्फ्यू दरम्यान निदर्शकांनी सांकेतिक निदर्शन म्हणून त्यांच्या पायातील चपला निदर्शनस्थळी ठेवल्या आहेत.

हल्लेखोर मोटारसायकलवर आले होते, असं नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यक्तीनं सांगितलं.

"हल्खोर मोटारसायकलवर आला आणि त्याच्यामागे एक ट्रे ठेवलेला होता. कदाचित त्यात रसायनं ठेवलेली असावीत," असं त्यांनी सांगितलं.

पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, असंही त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)