Delhi Election results: भाजपचा 48 जागांचा दावा खरा ठरू शकतो का?

मनोज तिवारी

फोटो स्रोत, TWITTER

    • Author, प्रशांत चाहल
    • Role, बीबीसी हिंदी

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचं मतदान पार पडल्यानंतर दिल्लीची बाजी कोण मारणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षात दिल्लीत 70 विधानसभांच्या जागांसाठी लढत झाली.

8 फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलने आपले अंदाज वर्तवले आहेत. आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल असं बहुतांश एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थांनी म्हटलं आहे.

भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले "हे एक्झिट पोल फेल होतील. आम्हाला 48 पेक्षा जास्त जागा मिळतील. आमचंच सरकार स्थापन होईल. आतापासून ईव्हीएमला दोष देण्याचं वातावरण तयार करू नका."

News image

तर आपने दावा केलाय की विजय त्यांचाच होणार आहे. पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून म्हटलंय की "आम्ही मोठ्या फरकाने जिंकणार आहोत."

मनोज तिवारी

फोटो स्रोत, Twitter

मनोज तिवारी यांनी केलेल्या दाव्यामुळे लोकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

त्यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप नेते तिवारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात भाजपचे नेते मतदानाचे आकडे देत आहेत. मतदान संपून 24 तास उलटून झाले अजून तुम्ही टक्केवारी जाहीर केली नाही. तुम्ही अजूनही म्हणत आहात की डेटा गोळा केला जात आहे. निवडणूक आयोगाचं नेमकं काय सुरू आहे. मतदानाचा फायनल आकडा हा भाजप ऑफिसमधून निघतो का? असा टोला त्यांनी लगावला.

मनिष सिसोदिया

फोटो स्रोत, Twitter

आम आदमी पक्षाने ही निवडणूक अरविंद केजरीवाल आणि त्यांनी केलेल्या विकास कामांभोवती ठेवली. आपने आपलं रिपोर्ट कार्डच जनतेसमोर ठेवलं. शिक्षण आणि आरोग्य खात्यांमध्ये केलेल्या सुधारणा बघा असं म्हणत आपने मतं मागितली. तर भाजपच्या प्रचाराचा जोर हा राष्ट्रवादावर होता.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)