Delhi Assembly Election 2020: अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी दिल्ली कोण जिंकणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रचारात दहशतवादी, शाहीन बाग, गोळी, फायरिंग, बलात्कार, बिर्याणी आणि हनुमान चालिसासारख्या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरीकडे पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि शिक्षण या शब्दांचा वापर कमी होताना दिसत आहे.
भाजप असो की आम आदमी पक्ष (आप) दोन्ही पक्ष एकमेकांना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, असे कोणते मुद्दे आहेत, ज्यामुळे या दोन्ही पक्षांना फायदा मिळू शकतो, त्यावर एक नजर टाकूया.
राष्ट्रवादाचा मुद्दा
2019च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये सामान्य नागरिकांनी एकत्र येत सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शन सुरू केलं, तेव्हा या निदर्शनाची दिल्लीच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका राहिल, अशी कल्पनाही कुणाला आली नसेल.
शाहीन बागच्या आंदोलनाला तुमचं समर्थन आहे का? असं आपचे नेते आणि दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, "जेव्हा आम्ही असं म्हणतो शाहीन बागमधील आंदोलकांचं समर्थन करतो तेव्हा भाजपला हातात आयतं कोलित मिळालं."
दिल्लीतील भाजप नेते असो की, दुसऱ्या राज्यातून आलेले स्टार प्रचारक, सगळ्यांनी या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवलं. मग यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं बिर्याणीचं वक्तव्य असो की, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं गोली मारो...हे वक्तव्य असो, की पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांचं ... ते लोक घरात घुसून बलात्कार करतील हे वक्तव्य असो.
परवेश वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दहशतवादी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग्य म्हटलं.

फोटो स्रोत, AFP
सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसाइटीज (सीएसडीएस) च्या संजय कुमार यांच्या मते, या अशा प्रकारच्या वक्तव्यांशिवाय भाजपकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता.
बीबीसीला त्यांनी सांगितलं, "भाजप गेल्या 20 वर्षांपासून दिल्लीत सत्तेच्या बाहेर आहेत. यामुळे मग कामाविषयी बोलण्यासाठी भाजपकडे काहीच नाहीये. अशातच शाहीन बागनं त्यांना एक मुद्दा घरबसल्या मिळाला आहे."
त्यामुळे मग केजरीवाल शाहीन बागमध्ये का जात नाही, असं आवाहन भाजप नेत्यांनी केलं आहे. केजरीवाल शाहीन बागला गेले तर भाजपचं काम अधिक सोपं होईल.
यामुळे मग केजरीवाल हिंदू विरोधी, राष्ट्रविरोधी आणि मुस्लिमांचे पाठीराखे असल्याची मोहीम भाजप चालवू शकतं. पण, भाजप मुद्दामून निदर्शकांना हटवत नाहीये, कारण त्यांना याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
आपच्या दाव्यांची पडताळणी
झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांत भाजपनं राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, पण निकाल अनपेक्षित आले. झारखंड आणि महाराष्ट्रात भाजपच्या हातातून सत्ता गेली, तर हरियाणात दुष्यंत चौटाला यांच्या साहाय्यानं भाजपनं सरकार स्थापन केलं.
याचा अर्थ राष्ट्रवादाचं राजकारण इतर राज्यांच्या निवडणुकीत अयशस्वी ठरलं का?
या प्रश्नाच्या उत्तरात संजय कुमार म्हणतात, "आपच्या पिचवर जाऊन खेळण्याची एक दुसरी नीती आखता आली असती. यात आपनं केलेल्या दाव्यांची पडताळणी भाजपला करता आली असती. काही प्रमाणात भाजपनं यासाठी प्रयत्न केले."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
गृहमंत्री अमित शाह, खासदार गौतम गंभीर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ट्वीटर टाईमलाईन पाहिल्यास तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल.
शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन वर्ग खोल्या तयार करण्याचा दावा असो की, मोहल्ला क्लिनिकचा दावा याविषयी भाजपच्या स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी आपच्या दाव्यांची पडताळणी केली.
याविषयीचा एखादा व्हीडिओ भाजपच्या मोठ्या नेत्यानं ट्वीट केल्यानंतर लगेच आपच्या सोशल मीडियान टीमनं त्याला प्रत्युत्तर दिलं.
पुन्हा एकदा मोदींचा चेहरा...
मदनलाल खुराना, साहेब सिंह वर्मा, विजय कुमार मल्होत्रा आणि डॉक्टर हर्षवर्धन हे आतापर्यंतचे दिल्ली भाजपचे प्रमुख चेहरे ठरले आहेत.
2015च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसांत मुख्यमंत्रीपदासाठी किरण बेदी यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाचं हे मोठं कारण होतं, असं आजही अनेक भाजप नेत्यांना वाटतं.
पक्षानं आता मात्र मोदींचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढायला सुरुवात केली आहे. पण, भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असं आवाहन आपनं केलं आहे. असं असलं तरी अमित शाह यांनी याबाबत अजून काहीच जाहीर केलेलं नाहीये.

फोटो स्रोत, TWITTER@MANOJTIWARIMP
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचं नाव चर्चेत होतं. पण, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचं नाव 24व्या क्रमांकावर आलं, तेव्हा मात्र पक्ष त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पाहत नाही, हे स्पष्ट झालं.
दिल्लीची जनताच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे, असं भाजपनं त्यानंतर जाहीर केलं. भाजपच्या निवडणूक प्रचाराचा हा खूप मोठा भाग आहे, असं भाजपचं राजकारण जवळून पाहणाऱ्यांना वाटतं. मुख्यमंत्र्यांचं नाव आधीच जाहीर केल्यास किरण बेदी यांच्यावेळीस झाली तशी गटबाजी पक्षात होऊ शकते.
असं असलं तरी, संजय कुमार वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते, मोदींच्या नावानं निवडणूक लढणं ही भाजपची चॉईस नसून मजबुरी आहे.
भाजपची संघटित व्होट बँक
2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. दिल्लीतील भाजपचा व्होट शेअर 32 टक्के इतका होता.
दिल्लीच्या इतिहासात भाजपची ही सगळ्यात वाईट कामगिरी होती. गेल्या 5 निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास भाजपला 32 ते 34 टक्के मतं मिळाली आहेत. याचा दिल्लीतील हक्काचा मतदार भाजपलाच मतदान करतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल.

फोटो स्रोत, TWITTER@MANOJTEWARIMP
लोकसभा निवडणुकीत या मतांचं जागेमध्ये रुपांतर होतं, पण विधानसभा निवडणुकीत असं काही होत नाही. त्यामुळे या हक्काच्या मताचं जागांमध्ये रुपांतर करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल.
संजय कुमार सांगतात, या निवडणुकीत भाजपला फक्त हक्काच्या मतदारांवर अवलंबून राहायला चालणार नाही. भाजपला इतर 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. पहिली म्हणजे दिल्लीची निवडणूक दोन पक्षांच्यामध्ये राहता कामा नये, असं झाल्यास आपला त्याचा फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे भाजपचे हक्काचे मतदार त्यांच्यापासून दूर जायला नको.
ते पुढे सांगतात, 2015च्या निवडणुकीत भाजपला 3 ठिकाणी विजय मिळाला, त्यावेळी पक्षाच व्होट शेअर 32 टक्के होतं, तर आपचं 54 टक्के होतं. दोन्ही पक्षांमध्ये जवळपास 22 टक्के व्होट शेअरचं अंतर होतं. या वेळेला असंच झाल्यास ते भाजपसाठी नुकसानीचं ठरेल.
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ
मंगळवारी दिल्लीतल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, केंद्र सरकारच्या अनेक योजना लागू करण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. दिल्लीतल्या गरिबांची काय चुकी आहे की, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणाऱ्या आयुष्मान योजनेचा त्यांना लाभ मिळत नाहीये?
केजरीवाल सरकारनं आयुष्मान योजनेला लागू का केलं नाही, हा मुद्दा भाजपनं प्रचारात वापरला आहे. इतकंच नाही तर भाजपनं या मुद्द्याला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिलं आहे.
केंद्र सरकारची दुसरी योजना जिचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला, ती म्हणजे उज्ज्वला योजना. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत उज्ज्वला योजनेचे 77 हजार कनेक्शन मिळाले आहेत. इतर राज्यांपेक्षा दिल्लीतील लाभार्थ्यांची संख्या सगळ्यांत कमी असल्याची केंद्र सरकारचा दावा आहे.

फोटो स्रोत, TWITTER@MANOJTIWARIMP
दिल्लीतील निवडणूक फक्त गृहमंत्री अमित शाह यांच्याच प्रतिष्ठेचा विषय नाही, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. कारण, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच कसोटी आहे.
याउलट आप त्यांचं रिपोर्ट कार्ड घेऊन लोकांच्या घरोघरी फिरत आहे. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर त्यांनी मवाळपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. ते फक्त भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत.
राष्ट्रवाद का फक्त भाजपचा मुद्दा नाही, तर अरविंद केजरीवाल स्वत:ला देशभक्त म्हणून सांगतात. त्यांचा पक्षच एकमेव देशभक्ती जपणारा पक्ष आहे, असं ते वारंवार टीव्ही चॅनेलला सांगत आहेत. दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. भाजपच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाला शह देण्यासाठी केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे.
आपचं धोरण
आपकडे अरविंद केजरीवाल यांचा चेहरा आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढचं सरकार स्थापन करण्यासाठी आप प्रयत्नशील दिसत आहे.
गेल्या 5 वर्षांतील कामामुळे जनता पुन्हा निवडून देईल, अशी केजरीवाल यांना आशा आहे.
200 युनिटपर्यंत मोफत वीज, 20 हजार लीटर मोफत पाणी, 400च्या जवळपास नवीन मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी मोफत बसचा प्रवास...केजरीवाल आणि त्यांचे नेते प्रत्येक सभेत हेच मुद्दे मांडत आहेत. या मुद्द्यांना धरूनच पुन्हा एकदा चांगली कामगिरी करता येईल, असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षानं संजय सिंह यांची निवड केली आहे. अरविंद केजरीवाल रोड शो आणि प्रत्यक्ष भेटीतून जनतेपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवत आहेत.
केजरीवाल यांची मुलगी आणि पत्नी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रचारकार्य पाहिलं. याव्यतिरिक्त पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला आपापल्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आलं आहे. यामुळेच पक्षाच्या पत्रकार परिषदेत आतिशी, दिलीप पांडे आणि गोपाल राय क्वचितच दिसून येतात.
तसं तर दिल्लीच्या जनतेनं भाजपच्या दाव्यांचा आदर केला की, आपच्या रणनितीचा हे 11 फेब्रुवारीला म्हणजे मतमोजणीच्या दिवशीच कळेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









