CAA: योगी आदित्यनाथ म्हणतात 'पाकिस्तानला न जाणाऱ्यांनी भारतावर उपकार केलेले नाहीत'

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला आता फक्त पाच दिवस राहिलेत. अशात कोणताही राजकीय पक्ष प्रचारात मागे नाही.

भाजपाचे बहुतांश नेते या विधानसभा निवडणुकीत यश मिळावं म्हणून प्रचार करीत आहेत. अगदी गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारात उडी घेतली आहे.

पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या योगी आदित्यनाथांशी बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी संवाद साधला.

News image

प्र- गेल्या काही निवडणुकांसारखंच भाजपाने त्यांचं ब्रह्मास्त्र म्हणून योगी आदित्यनाथांना मैदानात उतरवलं आहे. तुम्ही येताच प्रचाराचा नूर का पालटतो?

- हे बघा, जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका होतात तेव्हा देशातल्या इतर भागातील कार्यकर्ते निवडणूक प्रचारात भाग घेतात. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मीसुद्धा इथे आलो आहे. आम्ही इथे मुद्यांवर बोलतोय. आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. सुशासन आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आहे.

प्र- मग प्रचारात विकास, सुशासन, रोजगार असे कोणतेच मुद्दे ऐकू येत नाहीये. फक्त पाकिस्तान ऐकू येतंय, शाहीन बाग, बिर्याणी ऐकू येतंय. जी लोक काश्मीरच्या आतंकवादाला पाठिंबा देत आहेत, तेच शाहीनबागमध्ये निदर्शनं करत आहेत आणि स्वातंत्र्याचे घोषणा देत आहेत. यांच्या पूर्वजांनी भारताची फाळणी केली आहे म्हणून ही लोक एक भारत श्रेष्ठ भारत अशा प्रकारची वक्तव्यं तुम्ही करत आहात.

- देशाला नरक बनवणारं, देशात फुटीरतावाद आणि अराजकता पसरवणारं कलम हटवणं अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधीच्या पचनी पडत नाहीये. भारताच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार आहेच. आजही जेव्हा देशाचं सार्वभौमत्व आणि एक भारत श्रेष्ठ भारत अभियान पुढे नेण्यात येते तेव्हा काँग्रेस आणि केजरीवाल देशातलं वातावरण बिघडवण्याचे कुत्सित प्रयत्न करीत असतात. हे स्वीकाराहार्य नाही आणि देशातली जनता ते कधीही स्वीकारणार नाही.

प्र- मात्र शाहीनबाग मध्ये जी निदर्शनं होत आहेत, त्यात फक्त हिंदू मुस्लीम नाहीत तर स्त्रिया आणि लहान मुलं आहेत. तुम्ही म्हणताय की त्यांच्या पूर्वजांनी भारताची फाळणी केली होती तर..

- आम्ही म्हणतोय की त्यावेळी कोण होतं. काँग्रेसचं नेतेपद कुणाकडे होतं? काश्मीर समस्येचं मूळ पंडित जवाहरलाल नेहरू होते.

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

प्र- जे मुस्लीम लोक सीएए एनआरसीला विरोध करत आहे त्या लोकांच्या कुटुंबियांनी धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या देशात जायला नकार दिला होता हे खरं नाही का?

- त्यांनी उपकार नाही केलेत. त्यांनी भारतावर काहीही उपकार केलेले नाहीत. देशात फाळणीचा विरोध व्हायला हवा होता. ज्या गोष्टी भारताच्या हिताच्या आहेत त्याला पाठिंबा द्यायला हवा. जे भारताच्या विरोधात आहेत त्यांना विरोध करायला हवा. हेच आमची राष्ट्रभक्ती सांगते आणि हीच भारताच्या नागरिकांची जबाबदारी आहे. हे योगींच्या किंवा मोदींच्या सांगण्यावरून व्हायला नको. एखादी गोष्ट भारताच्या हिताची असेल तर त्याला पाठिंबा द्यायला हवा. जर भारताच्या विरोधात असेल तर त्याचा विरोध करावा.

प्र- मात्र भारताच्या घटनेत हेच सांगितलंय की कुणाबरोबरही कोणताच भेदभाव व्हायला नको.

- इथे कोणाचा अधिकार जातोय? कोण करतोय? हे लोक इथे स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. कशाचं स्वातंत्र्य हवंय?

प्र- सीएए चा विरोध करणाऱ्यांची मागणी आहे की ते धर्माच्या आधारावर लागू करायला हवं.

- नेहरू लियाकत करार कुणी केला होता? मोदींनी केला नव्हता ना.. नेहरू भारताचे पंतप्रधान होते आणि लियाकत अली पाकिस्तानचे. 1955 मध्ये नागरिकत्व कायदा कुणी तयार केला होता? तेव्हा कुणाचं सरकार होतं? 1947 मध्ये गांधीजी काय म्हणाले होते? ते म्हणाले होते की हिंदू आणि शीख जे पाकिस्तानात राहून गेले ते जेव्हा हवं तेव्हा भारतात येऊ शकतात. त्यांचं स्वागत व्हायला हवं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

प्र- जर असं असेल तर म्यानमारमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त हिंदू आहेत. अनेक हिंदूंचा छळ झाला आहे. अनेक रोहिंग्या हिंदू आहेत. त्यांच्याविषयी सरकारने का विचार केला नाही?

- हे बघा नागरिकत्वाचा कायदा ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी त्या रुपात लागू केला आहे. त्यात फक्त एका ओळीची सुधारणा केली आहे. प्रश्न असा आहे की पाकिस्तानात , बांगलादेशात,किंवा अफगाणिस्तानात मुस्लिमांना कोणताही त्रास नाही. हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांना त्रास झाला आहे.

प्र- अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचं वातावरण नाहीये का? तुम्ही आणि अमित शाहांनी वक्तव्य केलं की भाजपचं सरकार आणा, निदर्शकांना हटवलं जाईल. उत्तर प्रदेशात निदर्शनं करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई झाली आहे. गोळीबाराच्या घटना समोर आल्यात. आता विरोध करण्याचाही अधिकार नाही का?

- कारवाई का करायची नाही? विरोध लोकशाही पद्धतीने व्हायला हवा. ही लोकशाही नाही. रस्त्यावर बसणं, वाहतुकीला अडथळा आणणं, स्वातंत्र्याच्या घोषणा देणं, लोकशाही पद्धत नाही. तुम्ही निदर्शनं का करत आहात याची तुम्हाला कारणं द्यावी लागतील. तुम्हाला अनिर्बंध अधिकार मिळणार नाही. तुम्हाला घटनेच्या परिघात अधिकार मिळतील. घटनेच्या बाहेर नाही.

प्र- तुम्ही कुठेही शांततेत बसून निदर्शनं करू शकता असं घटनेत लिहिलंय. मुख्यमंत्री होण्याआधी तुम्ही स्वत: निदर्शनं करत होतात?

उ- नक्कीच करू शकतो. मी कुणाचीही परवानगी घेऊन निदर्शनं करू शकतो. मी जेव्हा निदर्शनं करायचो तेव्हा परवानगी घेऊन करायचो. एक फॉर्म मिळायचा, परवानगी मिळायची, तेव्हाच मी निदर्शनं करायचो. जेव्हा परवानगी मिळायची नाही तेव्हा आम्ही विरोध करायचो. कितीही वेळ रस्ता अडवणं, लोकांचं आयुष्य विस्कळीत करणं हे असे प्रकार केले नाही. या लोकांनी सगळं विस्कळीत केलं आहे. ही काय पद्धत आहे?

प्र- काही लोक रजईत बसली आहे आणि महिलांना समोर केलंय असं बोलणं किती योग्य होतं?

- मी म्हटलं होतं की सीएए च्या नावावर महिलांना आणि लहान मुलांना समोर केलंय आणि स्वत: रजई घेऊन झोपलेत. यापेक्षा जास्त भ्याडपणा काय असू शकतो? म्हणूनच उत्तर प्रदेशात ज्या लोकांनी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेतली आहे.

प्र- सार्वजनिक मालमत्तेच्या नावाखाली गोळ्या घालणं योग्य आहे का?

- कुणालाही गोळी मारलेली नाही. ते समाजकंटक होते. त्यांच्याकडे अवैध शस्त्रं होते. त्यांच्याकडे पेट्रोल बाँब होते. त्यांनी आधीपासूनच दगड गोळा केले होते. त्यांनी एका सुनियोजित कटाअंतर्गत ही संपत्ती जाळली आहे. लोकांवर हल्ला केला होता आणि कायदा स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न केला.

प्र- पोलीस म्हणाले की तुम्ही लोक पाकिस्तानला जा. त्यावर तुमचं काय मत आहे?

- जी व्यक्ती असं म्हणाली त्याचं काहीतरी कारण असेल. जर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा भारतात दिल्या तर आणखी काय म्हणायला हवं? पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी बोलून काहीही ऐकणार नाहीत. पाकिस्तानात घुसखोरी करून भारतात आतंकवाद पसरवणाऱ्या व्यक्तीला गोळीचीच भाषा कळते. शब्दांची नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

प्र- मोदी जेव्हापासून पंतप्रधान झालेत तेव्हा त्यांनी आतंकवाद्यांची ओळख पटवून त्यांना बिर्याणीऐवजी बंदुकीच्या गोळ्या दिल्या आहेत असं तुम्ही नुकतंच म्हणाला होता.

- खरंच तर बोललो. आम्ही बिर्याणी खाणारे लोक नाहीत. आम्ही बिर्याणी खात नाही आणि खाऊ घालत नाही. मी असं म्हटलं कारण काँग्रेस आणि केजरीवाल हे लोक हेच काम करतात. म्हणून मी म्हणालो की आता आतंकवाद्यांना गोळी नाही तर बिर्याणी मिळेल. याचा संबंध धर्माशी जोडू नका.

प्र- दिल्ली निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या येण्यामुळे मूळ मुद्दे गायब होतात याबाबत तुमचं काय मत आहे? योगी येतात आणि प्रक्षोभक भाषणाच्या आधारावर निवडणुका होतात?

- मी अतिशय विनयपूर्वक सांगू इच्छितो की माझा प्रचार मुद्द्यांवर आधारित आहे. केजरीवाल पाच वर्षांपूर्वी म्हणाले की ते शाळा तयार करतील, दर्जेदार शिक्षण देतील, मात्र शाळा तर झाली नाही मात्र मधुशाला नक्कीच तयार झाल्यात. ते म्हणाले की RO चं पाणी देतील, मात्र विष देत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांनी संपूर्णपणे उद्धवस्त केली आहे. आम्ही म्हटलं की आम्ही विकास, सुशासन आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर समोर आलो आहोत. जनतेने आम्हाला याच मुद्द्यावर मत दिलं आहे. आमचे आजही हेच मुद्दे आहेत.

प्र- अनुराग ठाकूर आणि परवेश शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

- या लोकांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. कोणत्याही जातीचं किंवा धर्माचं नाव घेतलेलं नाही. राजकीय वक्तव्यांना कोणत्याही घटनाक्रमांशी जोडणं योग्य नाही.

प्र- तुम्ही इथे दिल्लीत प्रचार करत आहात आणि तुमच्या राज्यात राजकीय हत्या होत आहेत. हिंदू महासभेच्या एका व्यक्तीची हत्या झाल्याची बातमी येत आहे. महिलांचे अर्धवट जळालेले मृतदेह मिळत आहेत. तुमच्या राज्यातल्या प्रशासनावर तुम्ही लक्ष का देत नाही?

- कोणतीही हत्या झालेली नाही. आमच्याकडे प्रशासन उत्तम पद्धतीने सुरू आहे. या सगळ्या प्रकरणातल सत्य लवकरच बाहेर पडल. सत्य परिस्थिती समोर येऊ द्या.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)