JNU Tapes: स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक बाबी उघड झाल्याचा चॅनेलचा दावा

जेएनयू च्या हिंसाचारावरून एका चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची चर्चा सध्या सुरू आहे.

आज तक ने पाच जानेवारीला झालेल्या हिंसाचारावरून एक स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी तोंड झाकून हल्ला केला त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करून संपूर्ण प्रकरण उघडकीला आणल्याचा दावा इंइंडिया टुडेनी केला आहे.

जेएनयूत झालेल्या हिंसाचाराचे व्हीडिओ समोर आले तेव्हा चेहऱ्याला कापड बांधलेली एक मुलगी तिथे दिसली. 'इंडिया टुडे' ने दावा केला आहे की या मुलीचं नाव कोमल शर्मा आहे. ती. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे आणि अभाविप शी निगडीत आहे.

पाच जानेवारीला कोमल तिथे होती या गोष्टीला दुजोरा मिळाल्याचा दावा या चॅनलने केला आहे.

या स्टिंग ऑपरेशनच्या एक दिवस आधी JNUTapes स्टिंगच्या पहिल्या भागात एक व्हीडिओ दाखवण्यात आला . त्यात काही युवक हिंसेत सामील असल्याचा दावा करत होते.

चॅनलचा दावा आहे की अक्षत अवस्थी असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो फ्रेंच डिग्रीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तो स्वत: अभाविपचा सदस्य असल्याचं सांगतो. त्याशिवाय रोहित शाह नावाच्या एका विद्यार्थ्याने हिंसाचारात सामील असल्याचं कबूल केलं होतं.

स्टिंगमध्ये मिळालेली माहिती आणि विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती यावरून पोलिसांनी व्हॉट्स अप ग्रुपचा शोध लावला. त्यात हिंसाचाराबदद्ल चर्चा झाली. त्यातील 60 पैकी 50 विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

चार जानेवारीला डाव्या विचारांशी निगडीत एका विद्यार्थी संघटनेने इंटरनेट सर्व्हर मोडल्याचा दावा चॅनलने केला आहे.

स्वतःला अभाविपचा कार्यकर्ता म्हणवून घेणारा अक्षत अवस्थी मात्र डाव्या संघटनांचा सदस्य असल्याचं अभाविपचं म्हणणं आहे. त्यांनी ट्वीट करून हे सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)