Palghar Fire: पालघरमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

फोटो स्रोत, Ani
पालघरजवळच्या तारापूर इथं केमिकल फॅक्टरीत लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी संध्याकाळी पावणेसात वाजता एनके फार्मा नावाच्या कंपनीत स्फोट झाला.
स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुख्यमंत्र्यांनी स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.
'असं वाटलं भूकंप आला'
स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकायला आल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या कंपनीत अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवलं जात होतं.
स्फोटाचा आवाज डहाणू व पालघर पर्यंतच्या गावांमध्ये ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Ani
या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी व मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या आवारामध्ये काही रुग्णवाहिका आल्या असून याठिकाणी गोंधळाचे वातावरण पसरले आहे.
"तारापूर एमआयडीसीतील एनके फार्मा कंपनीला आठ दिवसांपूर्वीच परवाना मिळाला होता. कंपनीतील ऑटो क्लेव्हची चाचणी शनिवारी होती. त्यादरम्यान स्फोट झाला. त्यावेळी कंपनीचे मालक आणि दहा-बारा माणसं उपस्थित होती. कंपनी परिसरातली विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. जनरेटरच्या माध्यमातून अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम हाती घेण्यात आलं आहे. आम्ही एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलं आहे. कारण स्फोटात बिल्डिंगचं नुकसान झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे," असं पालघरचे डीएम डॉ. कैलाश शिंदे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








