शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६२ आमदारांची मुंबईतल्या हॉटेलात संयुक्त ओळख परेड

े

फोटो स्रोत, ShivSena

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 162 आमदारांना मुंबईत शपथ देण्यात आली. "माझ्या हातून भाजपला मदत होईल असं कुठलंही कृत्य करणार नाही," अशी भारतीय संविधानाला स्मरुन ही शपथ देण्यात आली.

"आम्ही सत्यमेव जयते मानतो, सत्तामेव जयते नाही. आम्ही येणार असं आम्ही म्हणत नाही आम्ही ओलेलो आहोत," असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.

आता एकत्र आलेले सर्व आमदार हे फक्त पाच वर्षांसाठी एकत्र आलेले नाहीत तर आम्ही पाचाचा पाढा पुढे वाचत राहू असंही त्यांनी पुढे म्हटलंय.

हे गोवा नाही महाराष्ट्र आहे - शरद पवार

शरद पवार यांनी यावेळी कुठल्याही आमदारावर कारवाई होणार नाही, पद जाणार नाही याची जबाबदारी घेतो असा विश्वास यावेळी दिला आहे.

"सुप्रीम कोर्टाचा जो आदेश येईल तो पूर्णपणे पाळण्याची आपली तयारी आहे, अजित पवार यांचं वागणं पक्षाच्या विरोधात आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नव्या सदस्यांमध्ये व्हिपच्या मुद्द्यावरून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, अजित पवार यांना कुठलाही आदेश काढण्याचा अधिकार नाही. आम्ही वेगवेगळ्या लोकांची याबाबत मतं घेतली, त्यानुसार पक्षातून काढलेल्यांना अशा प्रकारचे अधिकार नाही. कुणावरही कारवाई होणार नाही याची मी स्वतः जबाबदारी घेतो," असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना एकत्र आणत मुंबईतल्या ग्रँट हयात हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केलं.

162 आमदार आमच्या ताब्यात असल्याचा दावा तिन्ही पक्षांनी केला आहे. या आमदारांना एकजूट राहण्याची शपथ देण्यात आली.

ज्या हॉलमध्ये ही शपथ दिली गेली तिथं सर्वत्र 'आम्ही 162' असे बोर्ड लावले होते. शिवाय तिथं भारतीय संविधानची एक प्रतिकृती सुद्धा उभारण्यात आली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ओळखपरेडनं सख्याबळ सिद्ध होत नसतं अशी टीका यावर भाजपनं केली आहे.

तिथं 145 तरी आमदार होते का, असा सवाल भाजपन उपस्थित केला आहे. तसंच विश्वासमत आम्हीच जिंकू असा दावासुद्धा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

"हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर आज मराठी माणसानं शरमेनं मान खाली घातली असेल, आज आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेतली, शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं," अशी टीका यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

कर्नाटकच्या उदाहरणाद्वारे यासंदर्भात निर्णय देऊ नये- तुषार मेहता

कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. राज्यपालांनी सद्सदविवेक बुद्धीने निर्णय घेतला आहे. विरोधकांना आमदार फुटून जाण्याची भीती. म्हणून विश्वासदर्शक ठरावाची घाई करू नये असं तुषार मेहता आणि मुकुल रोहतगी यांनी सांगितलं.

कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला

भाजपनेयाआधी अजित पवारांना सत्तास्थापनेसाठी साथ देण्याचं आवाहन केलं होतं परंतु पुरसे संख्याबळ नसल्याने त्यांनी पाठिंबा देणं नाकारलं होतं. राष्ट्रवादीच्या आमदारांचा आताचा निर्णय काय हे समजू शकत नाही. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नाही. याप्रकरणी विस्तृत सुनावणीची आवश्यकता असं मुकुल रोहतगी यांनी केली. कागदोपत्री राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचा पाठिंबा भाजपला.

मी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता, मला 54 आमदारांचा पाठिंबा

अजित पवारांनी दिलेल्या पत्राचा अनुवाद न्यायालयाला करून देण्यात येत आहे. 'मी अजित पवार गटनेता आहे, मला 54 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती शासन जास्त दिवस लागू राहायला नको', अशा आशयाचं पत्र अजित पवारांनी राज्यपालांन सादर केलं.

अजित पवारांचं पत्र आणि देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं पत्र हे मिळाल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं. यानंतर राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करायला हवी होती का? असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.

बहुमत आहे मग चंबळच्या डाकूंसारखे का वागता-संजय राऊत

'गुडगावच्या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्यात आलं. चंबळच्या डाकूंसारखी गुंडागर्दी का? बहुमत होतं म्हणूनच शपथ घेतलीत. जनतेची, राज्यपालांची फसवणूक करण्यात आली', अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात अजित पवारांसारखं वागणं मारक. बहुमत नसताना शपथ घेतलीत. आमचा आकडा तुमच्यापेक्षा दहाने जास्त असेल असा दावा संजय राऊत यांनी केला.

'पोलिसांच्या वेशातील गुंड असू शकतात. मती फिरलेली आहे. सत्ता नसेल तर वेडे होतील. वेड्यांची इस्पितळं उभारा. पराभवाचा धक्का पचणार नाही', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

'ऑपरेशन कमळ झालं आधीच. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स आणि पोलीस हे ऑपरेशन कमळ करतात. बहुमत असतं तर हे सगळं करण्याची गरज पडली नसती', असं राऊत म्हणाले.

कुटुंबात फूट पडू नये असं वाटतं. बाळासाहेब ठाकरेंनी मला राज ठाकरेंशी चर्चा करायला पाठवलं त्यामुळे अजित पवारांना कोण भेटायला जातंय यात आश्चर्यकारक काहीच नाही असं राऊत म्हणाले. बहुमताचा आकडा प्रतिज्ञापत्र असलेलं पत्र दिलं आहे असं त्यांनी स्पष्ट दिलं आहे.

line

संकटं येत राहतात, मार्ग निघतो- शरद पवार

'मला काही कठीण वाटत नाही. संकटं येतात, मार्ग निघतो. महाराष्ट्रातला तरुण वर्ग भक्कमपणे उभा राहतो. सामान्य लोकांचा पाठिंबा असताना आव्हानांची चिंता वाटत नाही', असं शरद पवार यांनी सांगितलं.

'अजित पवारांशी माझी भेट झालेली नाही. त्यांच्या बंडामागे माझा हात नाही. अजित पवारांची हकालपट्टी करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. पक्षाचा निर्णय तिन्ही पक्षांनी एकत्र जाण्याचा होता. अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक आहे. ते पक्षाचं मत नाही', असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, 'भाजप एक भूमिकाने प्रकर्षाने मांडत आला आहे. आम्ही वेगळे आहोत असा त्यांनी मांडलं होतं. हा गैरसमज होता. तो वेडेपणा होता. राज्यपालपदाचा गैरवापर करून, संकेतांना हरताळ फासून, घटनेच्या चौकटीत असो वा नसो. भाजपने आपला खरा चेहरा दाखवला.

सकाळी 8.30 वाजता: राष्ट्रवादीचे 52 आमदार परतलेत - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 आमदार आमच्याकडे परत आले आहेत आणि आणखी एक आमच्या संपर्कात असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ANIशी बोलताना सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राष्ट्रवादीचे इतर दोन आमदार - नितीन पवार मुंबईत आणि नरहरी झरवाल दिल्लीत आहेत - अशी माहिती ANIने ट्वीट केली आहे.

सकाळी 8.00 वाजता: राष्ट्रवादीचे आमदार हरियाणात सापडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांचा पत्त हरियाणाच्या गुडगाव येथील एका हॉटेलात सापडले. त्यांना काल रात्री दिल्लीहून मुंबईला आणलं गेलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (उजवीकडून तिसरे, पिवळ्या शर्टात) आणि दौलत दरोडा (उजवीकडून पाचवे)

फोटो स्रोत, ANI on Twitter

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (उजवीकडून तिसरे, पिवळ्या शर्टात) आणि दौलत दरोडा (उजवीकडून पाचवे)
line

काल काय काय घडलं?

राज्यात प्रमुख पक्षांच्या बैठकी आणि गाठी-भेटींचं सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

अजित पवार यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. थोडा वेळ धीर धरा. स्थिर सरकार स्थापन होईल असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अजित पवारांच्या या ट्वीटला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. ही अजित यांची वैयक्तिक भूमिका आहे असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत यासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

54 पैकी 52 आमदार आमच्याबरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड अजित पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार गायब होते. यापैकी नितीन पवार मुंबईत पोहोचले आहेत तर नरहरी झिरवाल दिललीत सुरक्षित ठिकाणी आहेत. अनिल पाटील आणि दौलत दरोडा हे काल रात्री विमानाने मुंबईला पोहोचले.

इतिहास म्हणजे आधीचं राजकारण आणि राजकारण म्हणजे सध्याचा इतिहास असं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांसंदर्भात ट्वीट केलं आहे. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य होते, आजही आहेत आणि उद्याही कायम असतील.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)