निकाल विधानसभेचा : मुंबईतल्या सर्व 36 जागांचा निकाल एकाच ठिकाणी

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, TWITTER/@AUThackeray

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागले आहेत. मुंबईकडेही राज्यासह देशाचं लक्ष आहे. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारंसघ आहेत. लोकसभेला मुंबईत शिवसेना-भाजपनं प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळं विधानसभेला मुंबईकर कुणाच्या बाजूनं उभे राहतात, याची उत्सुकता होती.

मुंबईतील निकालाची 5 वैशिष्ट्ये :

  • वरळीतून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विजयी
  • वांद्रे पूर्वमधून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पराभूत
  • भायखळ्यातून एमआयएमचे विद्यमान आमदार वारीस पठाण पराभूत
  • माजी मंत्री नरेंद्र मेहतांना डावलून भाजपनं तिकिट दिलेले पराग शाह घाटकोपर पूर्वेतून विजयी
  • मुंबईतील 36 मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपनं अधिक जागा जिंकल्या

मुंबईत शिवसेना आणि भाजपनं वर्चस्व राखलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खातंही उघडताही आलं नाही.

मुंबईत कुठल्या पक्षानं किती जागा जिंकल्या :

  • भाजप - 16
  • शिवसेना - 14
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 1
  • काँग्रेस - 4
  • समाजवादी पक्ष - 1

मुंबईतील 36 मतदारसंघाचा निकाल :

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)