शरद बोबडे : बाईकवर बसून फोटो काढल्यामुळे चर्चेत आलेले सरन्यायाधीश

फोटो स्रोत, ANI
भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर बसून फोटो काढल्यामुळे कोरोनाच्या काळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
न्या. बोबडे यांचे हे फोटो व्हायरल झाले असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी न्या. बोबडे यांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
न्या. बोबडे यांचे हे फोटो आवडल्याचेही काही लोकांनी ट्वीटरवर सांगितले आहे तर काहींनी या बाईकच्या मालकीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. न्या. बोबडे यांनी मास्क घातलेला नाही, हेल्मेट घातलेले नाही असे आक्षेपही घेण्यात आले.
याबाबत न्यायमूर्ती बोबडे यांची प्रतिक्रिया मात्र कळू शकलेली नाही.
न्या. बोबडे यांचे हे फोटो व्हायरल झाले असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी न्या. बोबडे यांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
न्या. बोबडे यांचे हे फोटो आवडल्याचेही काही लोकांनी ट्वीटरवर सांगितले आहे तर काहींनी या बाईकच्या मालकीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. न्या. बोबडे यांनी मास्क घातलेला नाही, हेल्मेट घातलेले नाही असे आक्षेपही घेण्यात आले.
याबाबत न्यायमूर्ती बोबडे यांची प्रतिक्रिया मात्र कळू शकलेली नाही. भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर बसून फोटो काढल्यामुळे कोरोनाच्या काळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
शरद बोबडे मूळचे नागपूरचे
न्यायाधीश बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. नागपूर विद्यापीठातून शरद बोबडे यांनी LLBची पदवी संपादन केली. यापूर्वी नागपुरात शिक्षण घेतलेले न्या. मोहम्मद हिदायतुल्ला हेही भारताच्या सरन्यायाधीशपदी पोहोचले होते.
नागपूरच्या या बोबडे कुटुंबाचा विधी क्षेत्राशी अत्यंत जुना संबंध आहे. न्या. शरद बोबडे यांचे आजोबा श्रीनिवास बोबडे प्रसिद्ध वकील होते. शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे महाराष्ट्राचे 1980 आणि 1985 असे दोनवेळा महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. त्यांचे भाऊ विनोद बोबडे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते.
बोबडे यांनी 1978 साली महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून काम सुरू केलं. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिलीला सुरुवात केली.

फोटो स्रोत, PTI
1998 पासून त्यांना ज्येष्ठ विधिज्ञ पदावरती काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मार्च 2000मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले. 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
एप्रिल 2013 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. एप्रिल 2021मध्ये ते निवृत्त होतील. त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ दीड वर्षाचा असेल.
गोगोई यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील ते दुसऱ्या क्रमाकांचे वरिष्ठ न्यायमूर्ती होते. तसंच ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही कार्यरत आहेत.
गाजलेले निवाडे आणि निर्णय
गेल्या सहा वर्षांमध्ये न्यायाधीश बोबडे यांचा अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समावेश आहे. आधार संदर्भात निर्णय देणाऱ्या तीन सदस्यीय खंडपीठात ते होते. आधार कार्ड नसलेल्या भारतीयास मूलभूत सेवा आणि सरकारी सबसिडीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय या खंडपीठाने दिला होता. त्या खंडपीठामध्ये न्या. शरद बोबडे, न्या. जस्ती चेल्लमेश्वर, न्या. चोकलिंगम नागप्पन यांचा समावेश होता.

2017 साली न्या. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने आणखी एका महत्त्वाच्या खटल्यात निर्णय दिला होता. एका महिलेनी गर्भपातासाठी केलेली विनंती या खंडपीठाने फेटाळली होती. वैद्यकीय तपासणी अहवालावर आधारित दिलेल्या या निर्णयामुळे 26 आठवड्यांच्या अर्भकाला जीवन मिळाले.
कर्नाटकमध्ये 'बसव वचनदीप्ती' या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधात पुस्तकाच्या लेखिका माते महादेवी यांनी अपिल केले होते. 2017 साली न्यायाधीश बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ती बंदी योग्य ठरवली होती. अशा अनेक निर्णयांमध्ये ते सहभागी होते. दिल्ली राजधानी परिक्षेत्रामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय न्या. टी. एस ठाकूर, न्या. अर्जून कुमार सिक्री आणि न्या. बोबडे यांनी दिला होता.
विधिज्ञांकडून स्वागत
ज्येष्ठतेच्या क्रमानुसार सरन्यायाधीशांची निवड होते. त्यानुसार पाहिल्यास शरद बोबडे यांच्यानंतर 2022 साली न्या. उदय ललित आणि त्यानंतर 2025 साली भूषण गवई सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशांनी केल्यानंतर विधिज्ञांनी त्याचं स्वागत केलं आहे. बीबीसीसाठी सुचित्र मोहंती यांच्याशी बोलताना सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राचे सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर सांगतात, "न्यायमूर्ती बोबडे दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक प्रकरणांबाबत अफाट ज्ञान असलेले एक अप्रतिम न्यायाधीश आहेत. ते एक सकारात्मक व्यक्तिमत्व आहेत. ते एक उत्तम प्रशासक आहेत. त्यांची निवड सरन्यायाधीशपदी झाल्यास ती अत्यंत योग्य निवड असेल. त्यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशांनीच केलेली आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे."
"मी न्यायमूर्ती बोबडे यांच्यासमोर काही वेळा केस लढवली आहे. ते एक अत्यंत चांगले व्यक्ती आहेत. ते शांतपणे आणि काळजीपूर्वक समोरच्यांचा युक्तिवाद ऐकून घेतात," असं विधीज्ञ दिनेश कुमार सिंह यांनी मोहंती यांना सांगितलं.
मानव हक्क कार्यकर्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील राधाकृष्ण त्रिपाठी सांगतात, "न्यायमूर्ती बोबडे नावाजलेले न्यायाधीश आहेत. मी त्यांच्या न्यायालयात अनेकवेळा युक्तिवाद केले आहेत. विशेषतः मानवी हक्कांच्या संदर्भातील प्रकरणांमध्ये त्यांचं ज्ञान अचाट आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








