अजित पवार: माझ्यामुळे शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने व्यथित होऊन राजीनामा

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पत्रकार परिषद घेतली. आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार भावूक झाले.

04 वाजून 10 मिनिटं: निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर पवार म्हणाले की राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार जे सांगतील तो निर्णय मला मान्य असेल असं अजित पवार म्हणाले.

04 वाजून 04 मिनिटं :या गोष्टीत वेगवेगळ्या पद्धतीनं मतप्रदर्शन होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी माझी मानसिकता तयार केली होती. या सगळ्यापासून थोडा वेळ शांत राहण्यासाठी एका ठिकाणी राहिलो होतो.आमच्या घरात गृहकलह नाही. आमचा परिवार मोठा असला, तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करेल तसंच आम्ही वागतो. आताही शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहे.

03 वाजून 58 मिनिटं : सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्वांशी शरद पवार यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. केवळ मी बोर्डावर होतो आणि आमचं नातं आहे म्हणून शरद पवारांना गोवण्यात येतंय का असा विचार माझ्या मनात येत होता. आपल्यामुळे शरद पवारांची या वयात बदनामी होतीये यामुळे मी व्यथित झालो. आणि मी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

03 वाजून 54 मिनिटं : सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पण या बँकेतील ठेवी 11 हजार-साडे अकरा हजार कोटींच्या ठेवी आहेत. ठेवींपेक्षा मोठा घोटाळा कसा, असा विचार मी करत आहे. सहकारी सूतगिरण्या किंवा अन्य संस्था टिकणविण्यासाठी नियमबाह्य मदत करावी लागते. सरकारनंही चार नेत्यांच्या कारखान्यांना वाचविण्यासाठी सरकारनंही अशी मदत केली आहे. मग आमच्यावर ठपका काय? निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का?

03 वाजून 36 मिनिटं : "माझ्या सद्सदबुद्धिला स्मरुन अचानक राजीनामा दिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला. अशी वेळ माझ्यावर यापूर्वीही आली होती. मी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा असाच अचानक दिला होता. तेव्हाही मी कोणाला काही सांगितलं नव्हतं. मी न सांगता राजीनामा दिल्याबद्दल ज्यांच्या भावना दुखावल्या त्या सर्वांची मी माफी मागतो. कार्यकर्त्यांचीही माफी मागतो," अजित पवारांना पत्रकार परिषदेत म्हटलं.

03 वाजून 43 मिनिटंः अजित पवारांची पत्रकार परिषद सुरू. अजित पवारांसोबत जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे अन्य नेते उपस्थित.

02 वाजून 36 मिनिटं : आपल्या राजीनाम्याबद्दल बोलण्यासाठी अजित पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद धनंजय मुंडेंच्या घरी होणार होती. मात्र नंतर हे ठिकाण बदलण्यात आलं.

02 वाजून 15 मिनिटं : शरद पवारांच्या घरी सुरु असलेली पवार कुटुंबियांची बैठक संपली. राजीनाम्याबद्दल बोलण्यासाठी तीन किंवा चार वाजता धनंजय मुंडेंच्या घरी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. त्यानंतर माध्यमांशी अधिक काही न बोलता अजित पवार निघून गेले.

बैठकीनंतर शरद पवार बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारले. मात्र चिंता करण्याचं कारण नाही. जे काही झालं, त्याबद्दल स्वतः अजित पवार बोलतील असं, शरद पवार यांनी म्हटलं.

01 वाजून 25 मिनिटं : अजित पवारांच्या मनात लोकांच्याबद्दल अतिशय वेगळ्या भावना आहेत. या माणसाला किती वेदना होत असतील हे लोकांना लक्षात येणार नाही. पवार कुटुंब अभेद्य आहे. कुटुंबानं एकत्र बसून निर्णय घेण्यात चुकीचं काय आहे. अजित पवारांना मुद्दाम त्रास देण्यात आला, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

01 वाजून 26 मिनिटं :गेल्या पंधरा वर्षात झालेल्या अनियमिततांबाबत कोर्टाच्या आदेशानंतर चौकशी सुरू आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही. पीआयएलनुसार चौकशी सुरू आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही. ही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. जाणूनबुजून करायचं असतं तर आम्ही पाच वर्षांमध्ये केलं असतं. दोन दिवस ते नॉन रिचेबल असल्यामुळं आम्ही त्रास देतोय असा संबंध जोडला जात होता. त्यांना नक्की कसा त्रास आहे हे जाणून घ्या. मगच आरोप करा, असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं.

सूडबुद्धीनं आम्ही काहीही केलं नाही. जे नियमांप्रमाणे चाललं आहे ते होऊ द्यावं. त्यावर कोर्टाचं लक्ष नाही. ही चौकशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू झाली आहे. तसंच न्यायालयानं पीआयएलनुसार आदेश दिले आहेत. असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं.

01 वाजून 05 मिनिटं : काल अचानक राजीनामा दिल्यानंतर 'नॉट रिचेबल' असणारे अजित पवार आज शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले आहेत. आता येथे पवार कुटुंबाची बैठक सुरू असून या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार आणि पार्थ पवारही उपस्थित आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

12 वाजून 50 मिनिटं : सिल्व्हर ओक इथं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले, "त्यांच्या मनात अनेक दिवस हा गोंधळ सुरू होता. त्यांच्यामुळे काकांना किती त्रास होतोय, कुटुंबीयांना त्रास होतोय. त्यामुळे अस्वस्थतेमुळे राजीनामा दिला आहे. वेगवेगळे तर्क वितर्क लावण्याची गरज नाही."

12 वाजून 50 मिनिटं : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायची नाही. योग्य वेळी मी माध्यमांशी बोलीन असं सांगितलं.

11. 30 मिनिटं : अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवारांच्या राजीनाम्यापूर्वीच्या घडामोडी

त्यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी ट्वीटरवर आणि पत्रकार परिषदेत त्यासंदर्भातील माहिती दिली होती. पवार यांनी ट्वीटरवर लिहिलं होतं, "पुण्याकडे येत असताना माझ्या कानावर बातमी आली की पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. कुटुंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांच्या राजीनाम्याचे कारण जाणून घ्यायचे आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, FACEBOOK

कुटुंबातील सदस्यांशी व त्यांच्या चिरंजीवांशी संपर्क साधला आणि मला असं दिसतंय की आजच त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये असं सांगितलं की, "मी सहकारी संस्थेमध्ये अतिशय काळजीपूर्वक काम करत असतो. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये किंवा शिखर बँकेमध्ये काही वेळेला काही मोठ्या संस्था ..साखर कारखाने असोत किंवा सूत गिरण्या असोत या आर्थिक अडचणी आल्या तर नाबार्ड आणि तत्सम संस्थेची एक नियमावली आहे की या संस्थांना रिव्हॅम्प कसं करायचं आणि रिव्हॅम्प केलं नाही तर या संस्था संकटात येतात. आणि साहजिकच ज्यांच्यासाठी संस्था आहे तो शेतकरीही संकटात येतो.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

म्हणून काही निर्णय हे राज्य सहकारी बँकेने घेतलेले आहेत. आणि त्या निर्णयाच्या संबंधीची चौकशी करण्याच्या संबंधी कोर्टातूनही सूचना आलेल्या आहेत. त्या सगळ्या चौकशी संबंधी मला काही चिंता नाही," असं त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये मुलांना सांगितलं"

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)