अमिताभ बच्चन: दादासाहेब फाळके 2018 पुरस्कार 'बिग-बी'ला जाहीर

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 2018चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमिताभ बच्चन यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचं ट्वीट करून सांगितलं.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 2017चा दादासाहेब फाळके पुरस्कार विनोद खन्ना यांना मरणोत्तर देण्यात आला होता.

अमिताभ बच्चन यांची चित्रपट कारकीर्द 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाद्वारे सुरू झाली. त्यांनी शेकडो सिनेमात अभिनयाशिवाय अनेक सिनेमांना आपला आवाजही दिला आहे. तसंच छोट्या पडद्यावर त्यांचा 'कौन बनेगा करोडपती?' हा रिअॅलिटी शो गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.

अमिताभ बच्चन यांना आजपर्यंत चित्रपटक्षेत्रातील फिल्मफेअर, आयफा, स्क्रीन अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स, स्टारडस्ट अशा जवळजवळ सर्वच मुख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

तसंच भारत सरकारतर्फे दिले जाणारे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे नागरी सन्मानांनीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर #DadaSahebPhalkeAward हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी बच्चन यांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, अमिताभ बच्चन सिनेप्रेमींच्या हृदयावर राज्य करणाऱ्यांपैकी एक आहेत. पाच दशकांत त्यांनी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय आणि प्रतिभेची झलक दाखवली आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.

राजनाथ सिंह यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, राजनाथ सिंह यांचं ट्वीट

रितेश देशमुखनेसुद्धा अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. त्याने लिहिलंय, हा पुरस्कार अगदी योग्य व्यक्तीला मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांना खूप खूप शुभेच्छा. मी भारावून गेलो आहे. हा माझ्यासह अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक चाहत्याचा सन्मान आहे. प्रकाश जावडेकर यांना धन्यवाद.

रितेश देशमुख

फोटो स्रोत, Twitter

लेखक व गीतकार प्रसून जोशी यांनी ट्विट केलं, अखेर दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळाल्याचं ऐकून आनंद झाला. त्यांना शुभेच्छा. पुढच्या पीढ्यांना असेच प्रेरणा देत राहा.

प्रसून जोशी

फोटो स्रोत, Twitter

आतापर्यंत कुणाकुणाला पुरस्कार?

1969 पासून हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. आतापर्यंत 65 जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्याच्यापैकी मागच्या दहा वर्षांत गौरवण्यात आलेले कलाकार खालीलप्रमाणे -

2017 - विनोद खन्ना

2016 - कसीनथुनी विश्वनाथ

2015 - मनोज कुमार

2014 - शशी कपूर

2013 - गुलजार

2012 - प्राण

2011 - सौमित्र चटर्जी

2010 - के. बालचंद्र

2009 - डी. रामानायडू

2008 - व्ही. के. मूर्ती

याव्यतिरिक्त मन्ना डे, देव आनंद, यश चोप्रा यांनाही या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)