अमिताभची इंस्टाग्राम स्टोरी – ब्लॅक अँड व्हाईट ते कलर

अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोच्यां माध्यमातून चंदेरी दुनियेतल्या त्यांच्या प्रवासाची ही एक झलक.

अमिताभ आणि मेहमूद

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांच्यासोबतचा बच्चन यांचा फोटो.
बेंगलुरूजवळ 'शोले'च्या चित्रीकरणादरम्यान जय-वीरू

फोटो स्रोत, Amitabh Bachchan / Instagram

फोटो कॅप्शन, ये दोस्ती हम नहीं तो़डेंगे - बेंगलुरूजवळ 'शोले'च्या चित्रीकरणादरम्यान जय-वीरू.
अमिताभ शोले अवॉर्ड

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, 'शोले'साठी गोल्डन ज्युबिली म्युझिक अॅवार्ड स्वीकारताना अमिताभ बच्चन. हा फोटो बच्चन यांनी 1 एप्रिलला शेअर केला होता. अस सांगितलं जातं की शोले पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा समिक्षकांना तो भावला नाही. रमेश सिप्पी यांनी हा सिनेमा पुन्हा एडिट करून रिलीज केला तेव्हा इतिहास घडला.
अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, अभिषेक बच्चनच्या जन्मानंतरचा हा फोटो. 12 जूनला शेअर केलेल्या फोटोसोबत त्यांनी लिहिलं होतं की यांची उंची आता 6 फूट 3 इंच आहे.
अमिताभ बच्चन इतर कलाकारांसमवेत

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, 1977ला रिलीज झालेल्या अमर अकबर अॅथनी या सिनेमाच्या शूटिंगवेळचा हा फोटो. बच्चन यांनी 29 मे रोजी हा फोटो शेअर केला होता. यात विनोद खन्ना, नीतू सिंग, शबाना आझमी, परवीन बाबी आणि स्वतः बच्चन दिसतात.
अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, मनमोहन देसाई यांचा 'कुली' 1983मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील हाणामारीच्या चित्रीकरणादरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. 10 जूनला केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, 'या घटनेनंतर मी एक पुरूष नर्स म्हणजे अभिषेक बच्चनच्या देखरेखी खाली होतो.'
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, जय आणि वीरू - शोले सिनेमातील शूटिंगच्या वेळी धर्मेंद्र सोबत अमिताभ
जया बच्चन

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, पत्नी जया बच्चनचा हा फोट शेअर करताना त्यांनी लिहिलं होत, 'माझी पत्नी जेव्हा माझी पत्नी नव्हती, त्यावेळचा हा फोटो.'
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, शोलेतील एक सीनची तयारी करताना धर्मेंद्रसमवेत
अमिताभ बच्चन आणि धोनी

फोटो स्रोत, Amitabh Bachchan, Instagram

फोटो कॅप्शन, एकदा महेंद्र सिंह धोनी बच्चन यांना भेटायला गेले होते. त्यावेळचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना त्यांनी लिहिलं होतं 'बागबान किंवा बाबुल सिनेमाच्या शूटिंगवेळी धोनी मला भेटायला आले होते. या महान व्यक्तीसोबत ही माझी पहिली भेट होती.'