धुळे: केमिकल कंपनीत जोरदार स्फोटानंतर आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

धुळे आग

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळच्या एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या किमान 4 गाड्या घटनास्थळी असून 11 जण ठार, तर 43 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या मृतांमध्ये एका चिमुलकीचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाला असून आग रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र ही केमिकल कंपनी असल्याने आग लगेच आटोक्यात यायला जरा वेळ लागेल, असं धुळ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ म्हणाले.

स्फोट एवढा मोठा होता की त्याचे हादरे आजूबाजूच्या गावातही जाणवले. या कंपनीत जवळपास 80 लोक एका शिफ्टमध्ये काम करतात, मात्र स्फोट झाला तेव्हा नेमके किती लोक आत होते, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र आग विझल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल, असं भुजबळ पुढे म्हणाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

दरम्यान, या घटनेत एकूण 11 जण ठार आणि 43 जखमी झाल्याचं धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितलं.

कंपनीमध्ये कुणीही अडकलेले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे, असंही ते पुढे म्हणाले. खबरदारी म्हणून प्रशासनाचे वाघाडी गाव रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत.

"सध्या बचाव कार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे प्राधान्य आहे. आग कशी लागली वगैरे, हे नंतर समोर येईलच. आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत," असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

पोलीस घटनास्थळी दाखल आहेत, पण कंपनी प्रशासनाच्या सूचनेनुसार आगीपासून सर्वच यंत्रणांना सुरक्षित अंतरांवर थांबवले गेले आहे.

आता पर्यंत 20 गंभीर जखमींना धुळ्याला रवाना करण्यात आलं असून 30 हून अधिक जणांवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)