काश्मीरः श्रीनगरच्या सौरामध्ये दगडफेक झाली-गृह मंत्रालय

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या शुक्रवारी नमाज झाल्यानंतर श्रीनगरच्या सौरा भागामध्ये दगडफेक झाल्याचे भारत सरकारनं मान्य केलं आहे.
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये प्रवक्ते लिहितात, "श्रीनगरमधील सौरा भागामध्ये झालेल्या घटनांबद्दल मीडियामध्ये बातम्या येत आहेत. 9 ऑगस्ट रोजी काही लोक स्थानिक मशिदीतून नमाज पढल्यानंतर घरी जात होते. त्यामध्ये काही उपद्रवी लोकही होते.
अशांतता पसरवण्यासाठी या लोकांनी सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली परंतु सुरक्षारक्षकांनी संयमाने वागून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, "माध्यमांमध्ये श्रीनगरच्या सौरा परिसरातील घटनेच्या बातम्या आल्या आहेत. 9 ऑगस्टला काही लोक स्थानिक मस्जिदीतून नमाज पठण करून परतत होते. त्यांच्यासोबत काही उपद्रवी लोक सहभागी होते.
अशांतता माजवण्यासाठी या लोकांनी विनाकारण सुरक्षा दलांवर दगडफेक केली. पण सुरक्षा दलांनी संयम दाखवला आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत एकही गोळी चालवली गेली नाही, याचा आम्ही पुनरुच्चार करतो."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1

X पोस्ट समाप्त, 2
बीबीसीचा व्हीडिओ
याआधी, बीबीसीने एक व्हीडिओ प्रकाशित करून श्रीनगरच्या सौरा भागात शुक्रवारी सरकारचा निषेध करणारं मोठं आंदोलन झाल्याबाबत सांगितलं होतं.
आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधूराच्या नळकांड्या आणि पॅलेट गनचाही वापर केल्याचं बीबीसीने सांगितलं.
पण अशा प्रकारचं कोणतंही आंदोलन झालं नाही, असा दावा त्यावेळी भारत सरकारचा केला होता. पण बीबीसीच्या विशेष व्हीडिओत लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले पाहता येऊ शकतं.
बीबीसीच्या वतीने प्रकाशित केलेला व्हीडिओ पहा-
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
श्रीनगरच्या सौरामध्ये आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हाणामारीत किती जण जखमी झाले, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
तर दुसऱ्या बाजूला निषेध आंदोलनात किरकोळ संख्येने लोक सहभागी झाले होते, असा दावा पहिल्यांदा भारत सरकारने केला होता.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विट करून म्हटलं, "पहिल्यांना रॉयटर्स आणि नंतर डॉनमध्ये एक बातमी प्रकाशित झाली. श्रीनगरमध्ये एक निषेध आंदोलन झालं आणि त्यात दहा हजार जणांनी सहभाग घेतल्याचं या बातमीत म्हटलंय. ही पूर्णपणे काल्पनिक आणि चुकीची बातमी आहे.
श्रीनगर/बारामुल्लामध्ये काही लहान-मोठे आंदोलन झाले पण त्यात 20 पेक्षा जास्त लोकसुद्धा सहभागी नव्हते."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शुक्रवारी जुम्माच्या नमाजानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात परिस्थिती सामान्य आहे. पण काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याबाबत ऐकण्यात आलं, असं तिथले बीबीसीचे रिपोर्टर आमीर पीरजादा यांनी सांगितलं.
पीरजादा सांगतात, श्रीनगरच्या सौरामध्ये शुक्रवारी एक मोठं निषेध आंदोलन झालं. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन शांततापूर्ण होतं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पण सुरक्षा दल समोर येताच त्यांच्यामध्ये चकमक झाली.
सुरक्षादलांनी आंदोलकांवर अश्रुधूर आणि पॅलेट गन यांचा वापर केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
शनिवारी आमीर पीरजादा यांनी सौराला जाण्याचा प्रयत्न केला. पण ते तिथं पोहोचू शकले नाहीत.
सौराच्या दिशेने जाणारे सगळे मार्ग बंद करण्यात आले होते. स्थानिक माध्यमांमध्ये काही जणांच्या जखमी झाल्याच्या बातम्या होत्या. पण बीबीसीला प्रत्यक्ष याची खात्री करता आली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)