काँग्रेस: सोनिया गांधींकडेच काँग्रेसची धुरा, राहुल गांधींचा अध्यक्षपदाला पुन्हा नकार

फोटो स्रोत, Getty Images
बारा तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीने हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. दुपारी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारावं अशी विनंती करण्यात आली पण त्यांनी नकार दिला.
सोनिया गांधी 1998 ते 2017 दरम्यान 19 वर्षांसाठी काँग्रेस अध्यक्षपदी होत्या. त्यांनी पद सोडल्यानंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य काही नावं चर्चेत होती. मात्र अखेर कार्यकारिणीने सोनिया गांधी यांच्या नावाला पसंती दिली.
राहुल यांनी दोन वर्ष अध्यक्षपद सांभाळलं. मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांनी अध्यक्षपदी राहावं याकरता काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरला मात्र राहुल यांनी निर्णय बदलला नाही. बैठकीत कार्यकारिणीने राहुल यांचा राजीनामा स्वीकारला.
कांग्रेस अध्यक्ष नेमण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली. अध्यक्ष ठरवण्यासाठी पाच प्रादेशिक गट तयार करण्यात आले होते.
दक्षिण गटाचे नेतृत्व राजीव सातव यांच्याकडे होते. यामध्ये मनमोहन सिंग, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक यांचा समावेश होता. उत्तर गटाचे नेतृत्व रजनी पाटील यांच्याकडे होतं आणि त्यामध्ये प्रियांका गांधी वड्रा आणि पी. चिदंबरम यांचा समावेश होता.
पश्चिम गटाची धुरा गौरव गोगोई यांच्याकडे होती आणि त्यामध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, ए.के. अँटनी आणि मोतीलाला व्होरा यांचा समावेश होता. उत्तर-पूर्व गटाचे नेतृत्व अरुण यादव यांच्याकडे होतं आणि त्यामध्ये अंबिका सोनी, अहमद पटेल यांचा समावेश होता.
पूर्व गटाची जबाबदारी सुश्मिता देव यांच्याकडे होती आणि त्यामध्ये सोनिया गांधी आणि के.सी. वेणूगोपाळ यांचा समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस पक्षाचे आतापर्यंतचे अध्यक्ष
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








