आता साध्या कंप्युटरवरूनही खेळता येणार पबजी गेम

फोटो स्रोत, PUBG
सध्या उपलब्ध असणाऱ्या शूटिंग गेम्स पैकी सगळ्यांत लोकप्रिय असणारा गेम म्हणजे - प्लेयर अननोन्स बॅटलग्राऊंड (PlayerUnknown's Battlegrowund) म्हणजेच पबजी.
या 'बॅटल रोयाल' पद्धतीचे अनेक गेम्स यापूर्वी आले आणि पबजीनंतरही आले. पण सर्वांत जास्त लोकप्रियता याच गेमला मिळाली. या गेमवरून, त्याच्या अॅडिक्शनवरून वादही झाले. गेमवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. पण या गेमची लोकप्रियता मात्र त्याने कमी झाली नाही.
आपल्या गेमिंग कंप्युटर्सहून खेळणारे हार्ड कोअर गेमर्स आणि मोबाईलवरून खेळणारे हौशी गेमर्स या दोन्हींमध्ये हा गेम तितकाच लोकप्रिय आहे. पण आता याच्याही पुढे एक पाऊल टाकत पबजी कॉर्पोरेशन आता या गेमची 'लाईट' (Lite) व्हर्जन आणत आहे.
ही लाईट व्हर्जन साऊथ ईस्ट आशियामध्ये काही काळापासून उपलब्ध होती पण आता ती लवकरच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, नेपाळमध्येही उपलब्ध असेल.
लाईट व्हर्जन म्हणजे नेमकं काय? कोणासाठी?
आतापर्यंतच पबजीची पीसी व्हर्जन खेळण्यासाठी गेमर्सकडे चांगली स्पेसिफिकेशन्स असणारा कंप्युटर किंवा गेमिंग कंप्युटर असणं गरजेचं होतं. फार कमी जणांकडे अशा मशीन्स असतात आणि त्या खूप खर्चिक असतात.
याशिवाय त्यांच्याकडे अतिशय फास्ट इंटरनेट कनेक्शन असणंही गरजेचं होतं कारण याचा थेट फटका गेम खेळताना बसत होता. पण पीसी व्हर्जनच्या या गरजांमुळे गेमची ही आवृत्ती मोबाईल आवृत्ती एवढी लोकप्रिय झाली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यांच्याकडे अशा स्पेसिफिकेशन्सची मशीन्स नव्हती, ते एम्युलेटर्सच्या मदतीने मोबाईल व्हर्जन पीसीवर खेळण्याचा प्रयत्न करत, पण गेमिंगचा तो भन्नाट इफेक्ट यातून मिळत नव्हता. म्हणून मग आता या पबजीची अशी आवृत्ती आणण्यात येत आहे, जी साध्या स्पेसिफिकेशन्सच्या कंप्युटरवही खेळता येईल. आणि ही आवृत्ती मोफत असेल.
कोणती पीसी स्पेसिफिकेशन्स गरजेची
ऑपरेटिंग सिस्टीम : विंडोज 7,8,10, 64 Bit
सीपीयू : Core i3, 2.4Ghz
रॅम : 4GB
GPU : Intel HD Graphics 4000
HDD - 4GB
काय असतील पबजी लाईटची वैशिष्ट्यं
हे व्हर्जन खास साध्या पीसीसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच गेमिंग एक्सपिरियन्स मोबाईल गेमिंगपेक्षा चांगला असेल. पबजीच्या मूळ व्हर्जनमधली सगळी फीचर्स यात असतील त्यामुळे गेमवर चांगला कन्ट्रोल असेल. शिवाय गेमची ही व्हर्जन मोफत उपलब्ध असेल. पण गेमर्सना गेममधले काही पर्याय किंवा बॅटल पासेस विकत घ्यावे लागतील अशी चर्चा आहे. याविषयीची अधिकृत माहिती अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
पबजी लाईट रजिस्ट्रेशन
पबजी लाईटसाठी रजिस्ट्रेशन करणं अगदी सोपं आहे. पबजीच्या ऑफिशियल साईटवर जाऊन 'जॉईन द इव्हेंट' (Join the event)वर क्लिक करून यासाठीची नोंदणी करता येईल. 3 जुलैपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही नोंदणी करणाऱ्या अनेकांना काही मोफत गोष्टी किंवा बक्षीसंही मिळणार आहेत. गेममधल्याच एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात ही बक्षीसं असतील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पबजीकडून खेळासाठीचे स्किन कोड्स ईमेलने पाठवण्यात येतील.
कंपनीचा काय फायदा
पबजी मोबाईल हा सध्या जगामध्ये सर्वात जात कमार् करणाऱ्या गेम्सपैकी एक आहे. खरंतर हा मोबाईल गेम F2P मोडेलमध्ये म्हणजे फ्री-टू-प्ले (मोफत) देण्यात येतो. पण त्या गेममध्ये पुढच्या टप्प्यावर गेमर्सकडून विकत घेतल्या जाणाऱ्या स्किन्स आणि वस्तूंमधून कंपनीला उत्पन्न मिळतं.
पबजी लाईटचं बिझनेस मॉडेलही असंच असण्याचा अंदाज आहे. साध्या कंप्युटरवरहा हा गेम खेळता येणार असल्याने साहजिकच आता हा गेम पीसीवर खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. जास्त चांगला गेमिंग एक्सपिरीयन्स मिळणार असल्याने मोबाईलवर हा गेम खेळणारेही लाईट व्हर्जन कंप्युटरवर खेळायला लागतील आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या स्किन्स वा बॅटल पासेसच्या खरेदीतून कंपनीला उत्पन्न मिळेल.
या गेमची एक वेगळी व्हर्जन चीनमध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये हा गेम - गेम फॉर पीस नावाने उपलब्ध आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








