बिस्किटामध्ये क्रीमऐवजी टूथपेस्ट लावणाऱ्या युट्यूबरला शिक्षा

फोटो स्रोत, The Washington Post/getty
एका युट्यूबरने एका बेघर माणसाला बिस्कीट खायला दिले ज्यात क्रीमऐवजी टूथपेस्ट होतं. या कृत्यासाठी त्याला 15 महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार स्पेनचा युट्यूबर कैगुहा रेन याला पीडित व्यक्तीचा सन्मान आणि नैतिकतेला धक्का पोहचवल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले, हे प्रकरण 2017 चे आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार रेनला त्याचे युट्यूब चॅनल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 2024पर्यंत तो कोणतीही व्हीडीओ पोस्ट करू शकणार नाही.
रेनला 20 हजार युरो इतका दंड हा पीडित व्यक्तीला द्यावा लागणार आहे. न्यून्यॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार रेनला तुरुंगातच राहावं लागण्याची शक्यता कमी आहे.
कारण स्पेनच्या नियमांनुसार जर एखाद्या व्यक्तींने कोणत्याही हिंसक प्रकारचा गुन्हा केला नसेल आणि त्याला दोन वर्षांपेक्षा कमी शिक्षेची सुनावणी झाली असेल तर ती पहिली चूक म्हणून माफी दिली जाते.
पीडित बेघर व्यक्तीचे नाव जॉर्ज एल. आहे. तो बार्सेलोनामध्ये येण्याआधी मेंढपाळ म्हणून काम करत होता.
न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवरुन लक्षात आले की रेनने या व्हिडीओला मिळणाऱ्या जाहिरातीवरुन दोन हजार यूरो कितकी कमाई केली.
न्यायालयात सांगितले गेले की अशा पद्धतीची ही पहिली घटना नाही तर रेन सतत दुर्बल लोकांसोबत असंच करतो.
या व्हिडीओमध्ये पीडित व्यक्ती हा उलट्या करू लागला होता. व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी रेनवर टीका केली.
रेनने स्वतःवर होत असलेल्या टीकेला घाबरून तो व्हिडीओ डिलीट केला आणि पीडित व्यक्तीकडे जाऊन त्याला 20 यूरोची लाच देण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पीडित व्यक्तीने कायदेशीर कारवाई करू नये म्हणून त्याला 300 यूरोची ऑफर दिली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








