You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योग दिवस: पंतप्रधान मोदी रांचीत तर मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये योगासनं– पाहा फोटो
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम पार पडले. दिल्लीहून रांची आणि मुंबईहून अगदी नांदेडपर्यंत अनेक ठिकाणी योगासनांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.
रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. योग हे सर्व धर्म, प्रांतांच्या पलीकडे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
तर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह खासदारांनी संसदेच्या प्रांगणात खासदारांनी योगासनं केली.
दिल्लीमध्ये विविध कार्यालयांमध्ये एकत्र योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून अरुणाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत योग दिन साजरा केला जात आहे.
दिल्लीमधील फ्रेंच दूतावासातही योगासनांचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस दूतावासातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर योगासनं केली.
तर मुंबईत गेटवे ऑफ इंडियासमोर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने योगासनांचा कार्यक्रम घेतला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी योगासनं केली. ही जम्मू येथील छायाचित्रं आहेत.
उंच डोंगराळ प्रदेशातील लेह येथे इंडो-तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनी योगासनं केली.
इंडो-टिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)च्या जवानांनी 14 हजार फूट उंचीवर ही योगासनं केली आहेत. रोहतांग पास इथे तापमान आता उणे 10 अंशावर आहे.
नेपाळमध्ये जनकपूर येथे जानकी मंदिराच्या आवारामध्ये भारतीय दुतावासाने योगदिनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले आहेत.
आगरतळा येथे आसाम रायफल्सने एक महिनाभर चालणाऱ्या मोफत योगशिबिरामध्ये जाऊन योगासनं केली.
अरुणाचल प्रदेशातील इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या नवव्या बटालियनच्या जवानांनी तेजू, लोहितपूर येथे नदीमध्ये योगासनं केली.
अरुणाचल प्रदेशात लोहितपूर येथे ITBPच्या जवानांनी योगासनं केली. त्यामध्ये घोडे आणि कुत्र्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.
डेझर्ट चार्जर ब्रिगेडने जैसलमेर येथे वाळवंटात योगासनं केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)