पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचे फोटो भारतीय वायूसेनेने केले प्रसिद्ध

रडार फोटो

फोटो स्रोत, ANI

27 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं नाही असा वाद निर्माण झाल्यानंतर सोमवारी भारतानं त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीचे रडार फोटो प्रसिद्ध केले आहेत.

बालाकोट हल्ल्याच्या दोन दिवसानंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल भारतावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होतो. त्यावेळी F-16 हे अमेरिकन बनावटीचं विमान पाडल्याचं भारतीय हवाई दलानं सांगितलं होतं.

पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारतीय हवाई दलानं पत्रकार परिषदेत सांगितलं.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणामुळे भारतीय हवाई दल आणखी माहिती जाहीर करणार नाही. तसं केलं तर गोपनियतेच्या कायद्याचा भंग होईल असं एअर व्हाईस मार्शल आरजीव्ही कपूर यांनी सांगितलं.

"रडारमधल्या फोटोवरून स्पष्ट होतं की नियंत्रण रेषेच्या पश्चिमेकडे विंग कमांडर अभिनंदन यांचा सामना पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाशी झाला होता. दुसरा फोटो हा पाकिस्तानचं F-16 विमान रडारवरून नाहीसं झाल्यावर 10 सेकंदांनी घेतला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचं F-16 विमान पाडण्यात आलं होतं," असं कपूर म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या आठवड्यात पाकिस्तानला अमेरिकेने जेवढी विमानं विकली होती तेवढी सगळी सुस्थितीत असल्याचा लेख अमेरिकेतल्या फॉरेन पॉलिसी या मासिकात प्रसिद्ध करण्यात आला होता. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्याचा हवाला देत ही माहिती देण्यात आली होती.

यानंतर याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

एअर व्हाईस मार्शल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एअर व्हाईस मार्शल आर.जी.के. कपूर (फाईल फोटो)

27 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या मिग-21 Bison या लढाऊ विमानानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचं एअर व्हाईस मार्शल कपूर यांनी सांगितलं.

"27 फेब्रुवारीला हवाई चकमकीत 2 लढाऊ विमानं पडली होती याबाबत काहीच शंका नाही. या दोन विमानांमध्ये पाकिस्तानचं F-16 आणि भारताच्या मिग-21 या विमानांचा समावेश होता," असं ते म्हणाले.

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी F-16 या विमानाचा वेध घेतला होता. पण ते नियंत्रण रेषेच्या पलिकडे उतरले त्यामुळं त्यांना पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यानी ताब्यात घेतलं होतं. ते 3 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)