महिलांविषयी तुम्ही कसा विचार करता? जरा ही क्विझ घेऊन चेक करा

महिलेविषयी तुमचं मत काय?
फोटो कॅप्शन, महिलांविषयी तुमचं मत काय?

कल्पना करा की एका मुलीच्या दंडावर एक टॅटू आहे आणि तिच्या शरीरावर अत्यंत तोकडे कपडे आहेत? तिच्याबद्दल तुम्ही काय मत बनवाल?

जर तीच मुलगी तुम्हाला देवळात दिसली तर तुमचं तिच्याविषयीचं मत वेगळं असेल का?

आपल्या दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते. आम्ही खाली काही प्रश्न दिले आहेत. त्याचं केंद्रस्थान ही महिला आहे. प्रत्येक प्रश्नाला काही पर्याय दिले आहेत. तुम्ही एक पर्याय निवडू शकता. तुम्ही उत्तर दिल्यावर तुम्हाला मूल्यमापन दिसेल. हे मूल्यमापन प्राध्यापक सविता सिंह यांनी केलं आहे. त्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीत जेंडर अॅंड डेव्हलपमेंट स्टडीजच्या प्राध्यापक आहेत.

या क्विझचा उद्देश तुम्हाला काही निर्णय देणं हा नाही. आम्ही तुम्हाला एक सल्ला देतो की ही क्विझ तुम्ही खूप वेळा खेळा. वेगवेगळ्या उत्तरांवर-पर्यायांवर क्लिक करा. स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करा आणि याबद्दल तुमच्या मित्रांनाही सांगा. त्यांच्याशी चर्चा करा.

आम्हाला खात्री आहे तुम्ही महिलांचा आदर करता, पण हे पाहणं देखील आवश्यक आहे की रोजच्या जगण्यात तुम्ही जे निर्णय घेता त्यामध्ये 'स्त्री-विरोधी इंजेक्शन'चा तर प्रभाव नाही ना?

तुम्ही 50 वर्षांचे आहात आणि सोशल मीडियावर अकाउंट बनवलं आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रोफाईलवर गेलात आणि पाहिलंत की, तिनं तिचे बार आणि पबमधले काही फोटो अपलोड केले आहेत. ती पुरुषांसोबत आहे आणि तोकडे कपडे घातले आहेत. ती दुसऱ्या शहरात कामाला आहे. अशावेळी तुम्ही काय कराल?

Q. तुम्ही 50 वर्षांचे आहात आणि सोशल मीडियावर अकाउंट बनवलं आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रोफाईलवर गेलात आणि पाहिलंत की, तिनं तिचे बार आणि पबमधले काही फोटो अपलोड केले आहेत. ती पुरुषांसोबत आहे आणि तोकडे कपडे घातले आहेत. ती दुसऱ्या शहरात कामाला आहे. अशावेळी तुम्ही काय कराल?

यातून हे दिसून येतं की कसे एक वडील त्यांच्या पत्नीद्वारे मुलांचं आयुष्य नियंत्रित करतात, त्यांच्यावर अधिकार गाजवतात. <br> <br>याच भारतीय पितृसत्ताक कुटुंबपद्धतीप्रमाणे एका कुटुंबप्रमुखाच्याच हाती घराची सर्व सूत्रं असतात.
तुम्ही ३५ वर्षांचे आहात आणि तुमच्या मित्रांसोबत राजकारणावर चर्चा करत आहात. एखाद्या राजकारणी व्यक्तीवर तुमचा मित्राबरोबर वाद सुरू आहे. तुमचा मित्र त्या राजकारणााची स्तुती करत आहे, तर तुम्ही निंदा. त्याचवेळी तुमची बायको चहा घेऊन येते आणि तुमच्या मित्राच्या मताशी ती सहमत होते. तुम्ही ज्या राजकारण्याला चांगला म्हणत आहात, त्याला तुमची बायको वाईट म्हणत आहे. अशावेळेस तुम्ही काय कराल?

Q. तुम्ही ३५ वर्षांचे आहात आणि तुमच्या मित्रांसोबत राजकारणावर चर्चा करत आहात. एखाद्या राजकारणी व्यक्तीवर तुमचा मित्राबरोबर वाद सुरू आहे. तुमचा मित्र त्या राजकारणााची स्तुती करत आहे, तर तुम्ही निंदा. त्याचवेळी तुमची बायको चहा घेऊन येते आणि तुमच्या मित्राच्या मताशी ती सहमत होते. तुम्ही ज्या राजकारण्याला चांगला म्हणत आहात, त्याला तुमची बायको वाईट म्हणत आहे. अशावेळेस तुम्ही काय कराल?

आपल्या पत्नीला बौद्धिक चर्चांमधून वगळणाऱ्या नवऱ्यांची पुरुषी मानसिकता यातून दिसून येते. यामधून बायकोला कमी लेखलं जातं आणि तिच्या दुःखात वाढच होते. तिला व्यक्त होण्यापासून रोखणं हे भारतीय पुरुषी मानसिकतेचं एक प्रतीक आहे. एखाद्या गंभीर किंवा महत्त्वाच्या विषयावर मत नसणारी बाहुलीसारखी बायको असलेली बऱ्याच पुरुषांना आवडते.
तुम्ही एका मुलीच्या खूप प्रेमात आहात आणि तुम्हाला तिच्याशी लग्न करायचंय. पण तिची एक अट आहे - तिला मूलबाळ नकोय. तुम्ही काय कराल?

Q. तुम्ही एका मुलीच्या खूप प्रेमात आहात आणि तुम्हाला तिच्याशी लग्न करायचंय. पण तिची एक अट आहे - तिला मूलबाळ नकोय. तुम्ही काय कराल?

महिलांसाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आई होणं किती महत्त्वाचं आहे, हे बिंबवण्याची ही एक पुरुषी समाजातली ठरलेली पद्धत आहे. मातृत्वाचं महत्त्व ती नाकारू शकत नाही आणि यामुळे समाजात तिचा मानही कमी होतो, हे तिला माहितीये.
तुम्हाला कळतं की तुमचा लहान भाऊ गे आहे. तो मास्क घालून LGBT रॅलीत सहभागी होतो. तसंच त्याचे दुसऱ्या मुलासोबत शारीरिक संबंध आहेत. तुम्ही काय कराल?

Q. तुम्हाला कळतं की तुमचा लहान भाऊ गे आहे. तो मास्क घालून LGBT रॅलीत सहभागी होतो. तसंच त्याचे दुसऱ्या मुलासोबत शारीरिक संबंध आहेत. तुम्ही काय कराल?

लैंगिकतेच्या पारंपरिक विचारांवर पुरुषी मानसिकता कशी प्रतिक्रिया देते, हे यातून कळतं. यामुळेच सामाजिकदृष्ट्या &quot;सामान्य&quot; मानल्या जाणाऱ्या लोकांनी नेहमीच याचा नको तो त्रास करून घेतला आहे.
तुम्ही एका जिममध्ये पहिल्यांदाच जाता आणि पर्सनल ट्रेनिंगचं पॅकेज घेता. त्यासाठी तुम्ही 5,000 रुपये वेगळे भरता. मग एक महिला तुमच्यापुढे येते आणि ती तुमची ट्रेनर असल्याचं तुम्हाला सांगते. तुम्ही काय कराल?

Q. तुम्ही एका जिममध्ये पहिल्यांदाच जाता आणि पर्सनल ट्रेनिंगचं पॅकेज घेता. त्यासाठी तुम्ही 5,000 रुपये वेगळे भरता. मग एक महिला तुमच्यापुढे येते आणि ती तुमची ट्रेनर असल्याचं तुम्हाला सांगते. तुम्ही काय कराल?

पुरुषांमधल्या महिला-विरोधी भावनेतून हा प्रतिसाद येतो.

तुम्ही या परिस्थितीत काय कराल?

तुम्ही महिलांबद्दल कसा विचार करता? या 5 प्रश्नांमधून जाणून घ्या

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)