'शिवसेनेनं धर्म नव्हे कला बघून बाळासाहेबांची भूमिका दिली'

"शिवसेनेनं माझ्यातली कला बघून बाळासाहेबांची भूमिका मला दिली", ही भूमिका देताना त्यांनी माझा धर्म पाहिलेला नाही. असं विधान अभिनेते नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी केलं आहे. बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अगामी 'ठाकरे' या बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटाविषयी आपली मतं मांडली. त्यांची संपूर्ण मुलाखत तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)