मध्य प्रदेश निकाल : काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा; मायावती, अखिलेश यादवांनी जाहीर केला पाठिंबा

कर्नाटक, भाजप, काँग्रेस, महाआघाडी, सीपीएम, जेडीएस

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, सोनिया गांधी आणि मायावती

मध्य प्रदेशात अखेर चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. मतमोजणीनंतर काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या असून आता बहुजन समाज पार्टीच्या दोन आमदारांसह मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. शिवाय इथे समाजवादी पार्टीला एक आणि चार जागा अपक्ष उमेदवारांना मिळाल्या आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी मंगळवारी रात्रीच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता चेंडू पटेल यांच्या कोर्टात आहे, ज्यांच्या हाती नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली होती.

मतदान
line

बुधवार सकाळी 10.50 : हाती-पंजा एक साथ

नुकत्याच आलेल्या निकालावरून दिसून येतं की, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील सामान्य जनता भाजपच्या पूर्णपणे विरोधात आहेत. भाजपची लोकविरोधी धोरणं या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यामुळे मग लोकांनी पर्याय म्हणून काँग्रेसला निवडून देणं पसंत केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

"आमचा काँग्रेसच्या अनेक धोरणांना विरोध आहे, काही मुद्दे पटत नाहीत, पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशात काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत," असं मायावती ANI शी बोलताना म्हणाल्या.

रात्री 11.10 : मध्य प्रदेशात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा करणार

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून सत्तास्थापनेसाठी दावा करण्यासाठी वेळ मागितली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

line

संध्याकाळी - 6.44 - अटीतटीची लढत कायम

व
line

संध्याकाळी 5.16 - काँग्रेसची बहुमतापेक्षा जास्त आकड्याची आघाडी

व
line

दुपारी 4.23 - काँग्रेस आघाडीवर

व
line

दुपारी 4.05 - काँग्रेस आघाडीवर

व
line

दुपारी 3.37 - वोट शेअरसाठी सुद्धा लढाई

काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार त्यांना आतपर्यंत 41.2 टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या खात्यात 41.3 टक्के मतं आली आहेत. अपक्ष उमेदवारांना तब्बल 6 टक्के मतं मिळाली आहेत. बसपला 4.6 तर 1.5 टक्के मतं नोटा म्हणून रजिस्टर झाली आहेत.

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

line

दुपारी 3.30 - विभागवार आकडेवारी

  • बघेलखंडमध्ये भाजप 35 आणि काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर
  • भोपाल भागात भाजप 13 आणि काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर
  • चंबल भागात काँग्रेस 24 आणि भाजप 6 जागांवर आघाडीवर
  • महाकौशलमध्ये काँग्रेस 25 आणि भाजप 15 जागी आघाडीवर
  • मालवा भागात काँग्रेस आणि भाजप 21-21 जागांवर आघाडीवर
  • निमाडमध्ये भाजप 15 आणि काँग्रेस 11 जागी आघाडीवर
line

दुपारी 3.20 - बसप ठरणार किंगमेकर

मध्य प्रदेशातल्या सध्याच्या स्थितीबाबत इंदूरमधले ज्येष्ठ पत्रकार अरविंद तिवारी यांचे विश्लेषण : -

आता फक्त 20 राउंड झाले आहेत. अजून 30 राउंड शिल्लक आहेत. त्यामुळे अजून चित्र स्पष्ट झालं आहे असं म्हणता येणार नाही, पण काँग्रेसला 116 -117 जागा मिळण्याची शक्यता आहे. मालवा-निमाड भागात काँग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. जे त्यांच्या पथ्यावर पडू शकतं.

शिवराज सिंग चौहान यांची प्रतिमा चांगली आहे, त्याचा त्यांना फायदा होताना दिसत आहे. शिवराज यांची लोकांमध्ये असलेली पकड आणि त्यांनी केलेली विकास कामं त्यांना फायदेशीर ठरत आहेत.

पण त्याचवेळी खुल्या प्रवर्गातील जातींची नाराजी आणि पक्षातल्या 63 लोकांनी केलेली बंडखोरी त्यांना महागात पडताना दिसत आहे.

सपामुळे काँग्रेस फायदा होईल असं वाटत होतं. पण तसं होताना दिसत नाही.

काँग्रेसनं कमलनाथ यांना मायवती यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. तसंच कमलनाथ आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

तसंच काँग्रेसनं ज्योतिरादित्य यांना सपा तर दिग्विजय यांना अपक्षांशी संपर्क करण्याची जबाबदारी दिली आहे.

line

दुपारी 3 वाजता - काँग्रेसची आघाडी, पण बहुमत नाही

काँग्रस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ जारी करून लोकांचे आभार मानले आहेत.

व

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)