You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा भाचा मोहम्मद उस्मान हैदर चकमकीत ठार
- Author, माजिद जहांगीर
- Role, बीबीसी हिंदी
काश्मीरच्या त्राल भागात बुधवारी, 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोलीस कारवाईत कट्टरतावादी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा भाचा मोहम्मद उस्मान हैदर ठार झाली आहे. कट्टरतावादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या या चकमकीत एकूण दोन जण ठार झाले.
श्रीनगरापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या पुलवामा जिल्ह्लयात त्राल शहरातल्या चंकेतार या गावात सुमारे सहा तास चाललेल्या चकमकीत मोहम्मद उस्मान हैदर ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
पोलिसांनी या चकमकीत कट्टरतावाद्यांकडून M-4 कार्बाइन आणि AK-47 रायफल जप्त केली.
त्रालमध्ये ठार झालेले कट्टरपंथी हे गेल्य काही दिवसांत झालेल्या हल्ल्यात सहभागी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्या हल्ल्यात दोन अधिकारी ठार झाले होते, तर तीन जण जखमी झाले.
पहिला हल्ला दक्षिण काश्मीरच्या त्रालमध्ये लष्कराच्या तळावर झाला. त्यात एक जवान ठार आणि एक जवान जखमी झाला.
दुसरा हल्ला झाला तो श्रीनगरच्या जवळच्या नौगाममध्ये. त्यात एक असिस्टंट सबइन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आणि एक जवान जखमी झाला.
गेल्या वर्षीही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, 7 नोव्हेंबर 2017ला कट्ट्रतावादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत मसूद अजहरचा भाचा सहभागी होता. तो त्याच्या दोन साथीदारांसोबत मारला गेला, असा दावा पोलिसांनी केला होता.
त्यानंतर काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत पहिल्यांदाच M-4 रायफल दाखवली होती.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)